PM Swamitva Yojana | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून ग्रामस्थांना मिळतोय जमीनीचा मालकी हक्क, याबाबत सविस्तर जाणून घ्या

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या (Modi Government) प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा (PM Swamitva Yojana) लाभ गावातील लोकांना मिळत आहे. या योजनेच्या अंतर्गत ग्रामस्थांना जमीनीचा मालकी हक्क मिळेल ज्यांच्याकडे जमीनीचे कागदपत्र नाहीत. इतकेच नव्हे सरकार अशा लोकांच्या जमीनी रेकॉर्डमध्ये आणेल. पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि गुजरातसह अनेक राज्यात निवडणुका आहे. यासाठी सरकार आपल्या योजनांची (PM Swamitva Yojana) माहिती जनतेपर्यंत पोहचवत आहे.

 

हा आहे योजनेचा हेतू

केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वामित्व योजनेची सुरुवात 24 एप्रिल 2020 ला केली होती. यापाठीमागे सरकारचा हेतू सामाजिक-आर्थिक सशक्तीकरण आणि आत्मनिर्भर ग्रामीण भारताला प्रोत्साहन देणे आहे. सरकारचा दावा आहे या योजनेतून गावाचा विकास आणि विश्वासाला प्रोत्साहन मिळेल.

 

ग्रामस्थांना मिळेल लाभ

प्रधानमंत्री स्वामित्व योजनेद्वारे गावातील लोकांना कर्ज आणि इतर सुविधा घेण्यासाठी आपल्या जमीनीचा वापर करता येईल. ग्रामस्थ जमिनीचे कागद दाखवून कर्ज घेऊ शकतील. 2021 ते 2025 च्या दरम्यान देशभरात साडेसहा लाख गावांचा या योजनेत सहगाभी करण्याचे लक्ष्य आहे.

 

या राज्यांमध्ये लागू झाली योजना

केंद्राची ही योजना महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या
काही गावांमध्ये 2020-21 च्या दरम्यान लागू केली आहे. केंद्र सरकार लवकरच याची कक्षा वाढवू शकते.

 

Web Title :- PM Swamitva Yojana | pm swamitva yojana of central government villagers are getting ownership land know everything

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा