लॉकडाऊन वेळी आपण घरात आहात, पण आपल्यापैकी कोणीही ऐकटे नाही, PM मोदींच्या अभिभाषणातील 10 खास गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी 9 वाजता व्हिडिओद्वारे देशीतील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, देश एकत्र होऊन कोरोनाविरुद्ध लढा देऊ शकतो. लॉकडाऊनच्या वेळी हे एकत्रीत घडत असल्याचे दिसून येत आहे. काही लोक असा विचार करत आहेत की आणखी किती दिवस अशा प्रकारे रहावे लागेल. मात्र, हा लॉकडाऊनची वेळ आहे, आपण आपल्या घरात आवश्य आहेत, पण कोणही ऐकटे नाही. 130 कोटी लोकांची एकत्रीत शक्ती ही प्रत्येक व्यक्तीची एकता असल्याचे, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेद्र मोदींच्या अभिभाषणातील 10 प्रमुख गोष्टी

1. कोरोनाच्या जागतिक महामारी दरम्यान देशातील लॉकडाऊनला नऊ दिवस होत आहेत. दरम्यान तुम्ही सर्वांनी शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन दिले ते अभूतपूर्व आहे. ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यासाठी प्रशासनाने आणि जनतेने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

2. 22 मार्च रोजी कोरोनाविरुद्ध लढत असलेल्या प्रत्येकाचे आपण सर्वांनी ज्या प्रकारे आभार माने ते देशासाठी एक उत्तम उदाहरण बनले आहे. आज बरेच देश याची पुनरावृत्ती करत आहेत.

3. लॉकडाऊनचा काळ अत्यंत गरजेचा आहे. आपण सर्वांनी घरात जरूर रहायचे आहे. मात्र यापैकी कुणीही एकटे नाहीत. 130 कोटी जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक व्यक्तीच्या सोबत आहे.

4. आपल्याकडे असे मानले जाते की जनता जनार्दन हे ईश्वराचे रुप आहे. म्हणून ज्यावेळी देश एवढी मोठी लढाई लढत असताना आम्हाला जनता जनार्दनाचे विराट रुप, त्यांची अपार शक्ती याचा सतत साक्षात्कार करत राहिले पाहिजे.

5. आपल्याला सतत प्रकाशाच्या दिशेने जायचे आहे. ज्यांना कोरोनामुळे सर्वाधिक त्रास झाला आहे, त्या आपल्या गरीब भावंडांना संकटापासून आलेल्या निराशेतून आशेच्या किरणाकडे घेऊन जायचे आहे.

6. या कोरोना संकटामुळे निर्माण झालेला अंधार आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याला समाप्त करून आपल्याला प्रकाशच्या दिशेने जायचे आहे. या कोरोनाच्या संकटाचा पराभव करण्यासाठी आपल्याला प्रकाशाच्या तेजाला चारी दिशांना पसरवायचे आहे.

7. येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिलला आपल्याला कोरोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून प्रकाशाची शक्ती दाखवून द्यायची आहे. यासाठी 130 कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे.

8. 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला फक्त आपले 9 मिनिटे हवी आहेत. यावेळी तुम्ही तुमच्या घरातील सर्व लाईट्स बंद करा. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा मोबाइलची फ्लॅशलाईट लावा. हे 9 फक्त मिनिटे करा.

9. त्या प्रकाशात आपण आपल्या मनामध्ये संकल्प करूया की आम्ही एकटे नाही, कोणीही एकटा नाही.

10. माझी आणखी एक विनंती आहे की, यावेळी कोणीही कुठेही एकत्र येऊ नका. रस्त्यावर किंवा मोहल्ल्यामध्ये जाऊ नका, आपल्या घराच्या, बाल्कनीच्या दारातून हे करा.