कोण हे ‘ब्रू’ शरणार्थी ? ज्यांच्या संगोपणासाठी केंद्र सरकार 600 कोटी रूपये देतीय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रू – रियांग शरणार्थिना त्रिपुरामध्ये स्थायी स्वरूपात वसवण्यासाठी केल्या गेलेल्या कराराचे स्वागत करत म्हंटले की, यामुळे ब्रू – रियांग शरणार्थिंना खूप मदत होईल. तसेच यानंतर ब्रू – रियांग शरणार्थिना सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा फायदा घेता येणार आहे. गुरुवारी गृहमंत्री अमित शहा आणि ब्रू – रियांग शरणार्थिच्या प्रतिनिधींनी एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे ब्रू – रियांग शरणार्थिच्या अडचणींचे निवारण होणार आहे.

गृह मंत्र्यांनी सांगितले की, त्रिपुरामध्ये तीस हजार ब्रू शरणार्थिना वसवले जाणार आहे. यासाठी 600 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले त्यामध्ये ते म्हणतात, आजचा दिवस खूप चांगला आहे आणि हे सरकार तेथील लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि या करारामुळे शरणार्थीना नक्कीच मदत होईल असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

कोण आहेत ब्रू शरणार्थी –
ब्रू शरणार्थी हे दुसऱ्या देशातील नागरिक नसून आपल्याच देशातील लोक आहेत. ज्यांना ब्रू जनजाती म्हणून देखील ओळखले जाते. 1995 मध्ये, यंग मिझो असोसिएशन आणि मिझो स्टुडंट्स असोसिएशनने ब्रू जमातीला बाहेरचे म्हणून घोषित केले. ऑक्टोबर 1997 मध्ये ब्रू लोकांवर भयंकर हिंसाचार झाला ज्यामध्ये कित्येक गावांमध्ये अनेक घरे जाळली गेली. ब्रू शरणार्थींनी मिझोरामहून स्थलांतर केले आणि त्रिपुरामध्ये आश्रय घेतला आणि सर्वांना उत्तर त्रिपुराच्या कंचनपुरात तात्पुरत्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आले. तेव्हापासून, ब्रू लोक आपले प्राण वाचवण्यासाठी रिलीफ कॅम्पमध्ये राहत आहेत.

मिळणार या सुविधा –
करारानुसार आता शरणार्थीना सर्व मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. आता यांना दोन वर्ष फ्रीमध्ये किराणा आणि दोन वर्षांसाठी पाच हजार रुपये प्रती महिना अशी मदत दिली जाणार आहे.
या शरणार्थीना चार लाखांच्या फिक्स डिपॉझिटसह चाळीस ते तीस फुटांचा प्लॉट देखील दिला जाणार आहे. इतर सुविधांसोबत त्यांचे नाव मतदान यादीत देखील घेतले जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/