PMAY | पीएम आवास योजनेत मिळू शकते आणखी एक मोठी सुविधा, होईल फायदा; जाणून घ्या याबाबत सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्योग संघटना सीआयआय CII ने रविवारी सरकारकडे मागणी केली की, प्रधानमंत्री आवास (PMAY) योजना पुन्हा लाँच करावी आणि यामध्ये लाईफ इन्श्युरन्सची (Life insurance) सुविधा अनिवार्य करावी. ज्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचे PMAY कर्ज मिळते, त्यांच्यासाठी अनिवार्य प्रकारे इन्श्युरन्सची सुविधा देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

सरकारने देशातील सर्व लोकांना घर देण्याची योजना बनवली आहे ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना यशस्वी ठरली आहे.
यामध्ये मुख्य कर्जदाराचा मृत्यू झाला किंवा दुर्घटनेत अपंगत्व आल्यास त्याचे घराचे स्वप्न भंग होऊ नये.
हे पहाता सरकारकडून कर्जासह जीवन विमा योजनेचा लाभ सुद्धा देण्याची मागणी केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना PMAY केंद्र सरकारच्या (Central Government) वेगवेगळ्या मिशनपैकी एक सर्वात प्रमुख आहे.
या अंतर्गत केंद्र सरकारने 2022 पर्यंत जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष होतील,
तोपर्यंत सर्वांना घर देण्याचे लक्ष्य ठरवले होते.
या लक्ष्यात कोणतीही कुचराई होऊ नये यासाठी सीआयआयने सरकारला आवास योजनेसह लाभार्थ्यांना जीवन विम्याचा फायदा देण्याची मागणी केली आहे.

या अंतर्गत जर मुख्य लाभार्थ्याचा मृत्यू झाला किंवा दुघटनेत अपंगत्व आले तरी सुद्धा त्याच्या घराच्या स्वप्नात अडचण येऊ नये.
त्या कुटुंबाचा खर्च जीवन विम्याच्या पैशाचर चालेल आणि घर सुद्धा बांधले जाईल,
हे पहाता लाईफ इन्श्युरन्सची मागणी केली गेली आहे.

Web Title :-  PMAY | pradhan mantri awas yojana pmay scheme to relaunch with life insurance for all borrowers under housing for all scheme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Porn Film Case | पोलिसांनी छापा टाकून ‘सर्च’ सुरू केल्यानंतर ‘ढसा-ढसा’ रडत होती शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रासोबत सुद्धा झाला होता वाद !

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,843 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mumbai Police Recruitment 2021 | मुंबई पोलीस दलात विधि अधिकारी पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख