PMC Action On Rooftop Hotel In Mohammed Wadi | महंमदवाडीतील बेकायदा रुफटॉप हॉटेल पाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMC Action On Rooftop Hotel In Mohammed Wadi | महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने आज महंमदवाडी येथील बी.बी.सी. या रुफ टॉप हॉटेलचे अनधिकृत बांधकाम आणि शेड पाडून टाकण्यात आले. विशेष असे की या हॉटेलवर यापुर्वी देखिल दोन वेळा कारवाई करून गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.(PMC Action On Rooftop Hotel In Mohammed Wadi)

महंमदवाडी येथील एका इमारतीच्या टेरेसवर सुमारे चार हजार चौ.फुट जागेवर पत्रा शेड उभारून बी.बी.सी. हॉटेल सुरू होते. हे हॉटेल बेकायदेशीररित्या सुरू असल्याने यापुर्वी देखिल कारवाई करण्यात आली होती. परंतू कारवाईनंतर पुन्हा सुरू करण्यात आले होते. दरम्यान, कल्याणीनगर येथील ड्रंक ऍन्ड ड्राईव्हच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने हॉटेल्स, पब आणि रेस्टॉरंटच्या बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी विशेष मोहीम उघडली आहे. मागील चार दिवसांत साठहून अधिक हॉटेल्स, पब्ज व रेस्टॉरंटची बेकायदा बांधकामे पाडली आहेत.

आजही बी.बी.सी. या रूफटॉप हॉटेलचे सुमारे चार हजार चौ.फुटांचे बांधकाम आणि सुमारे साडेतीन हजार चौ.फुटांचे पत्रा
शेड पाडण्यात आले. अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे, उपअभियंता हनुमान खलाटे
यांच्या नेतृत्वाखाली शाखा अभियंता संदीप धोत्रे, सागर सकपाळ आणि रुतुजा चीलकेवार यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्त
आणि यांत्रीक आयुधांनी बेकायदा बांधकाम आणि शेड पाडून टाकले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujani Dam | पुणे, सोलापूरकरांचा घसा कोरडा; उजनी धरण परिसरातील नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा

Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : मुलगी 15 फूट हवेत उडाली, आरोपी नशेत; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम