PMC Anti Encroachment Action | पुणे महापालिकेचा हॉटेल फाऊंटन व बांबू हाऊसवर कारवाईचा हातोडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Anti Encroachment Action | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) हद्दीत अतिक्रमण विरोधातील कारवाई जोरात सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये अतिक्रमण केलेल्या घरांवर, दुकानांवर, हॉटेलवर कारवाई करण्यात येत आहे. शहरात सगळीकडे अतिक्रमण (PMC Anti Encroachment Action) कारवाई जोरात सुरू आहे. पुणे महापालिकेने गुरुवारी (दि.7) शिवाजीनगर येथील दोन हॉटेलवर कारवाई करुन 5200 चौरस फुट जागा मोकळी केली आहे.

पुणे महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्या शिवाजीनगर परिसरातील हॉटेल फाऊंटन (Hotel Fountain) आणि बांबू हाऊस (Bamboo House) या दोन हॉटेलवर कारवाई केली. या कारवाईत पालिकेने 5200 चौरस फुट जागा मोकळी केली आहे. कारवाईमध्ये गॅस कटर, बिगारी यांचा वापर करण्यात आला होता. महानगरपालिकेची हॉटल वरील कारवाईचा धडाका कायम आहे.

या कारवाईमध्ये कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे (Executive Engineer Bipin Shinde),
उपअभियंता सुनिल कदम (Deputy Engineer Sunil Kadam), शाखा अभियंता राहुल रसाळे
(Branch Engineer Rahul Rasale), समीर गडई (Sameer Gadai), पोलीस दल (Pune Police) यांनी सहभाग घेतला.
पुणे महानगर पालिकेकडून मोठा फौजफाटा घेऊन ही अतिक्रमणे काढली जात आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | 9 हजार रुपये लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | विद्यार्थ्यांना अडवून कोयत्याने मारुन लुटण्याचा प्रयत्न,विश्रामबाग पोलिसांकडून आरोपींना तीन तासात अटक

Pune Lok Adalat | ‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेतून 9 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन