PMC Anti-Encroachment Drive | पुणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई, 53 हजार 835 चौरस फूट बांधकाम जमिनदोस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Anti-Encroachment Drive | पुणे महापालिकेकडून झोन क्रमांक 2 आणि 4 मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. पालिकेने झोन क्र.2 येवलेवाडी स.नं.10, 69, 30 व झोन क्र.4 घोरपडी व मुंढवा स.नं.69, 89, 52, 54, 73 येथील विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई केली असून 53835.13 चौरस फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. (PMC Anti-Encroachment Drive)

या कारवाईमध्ये झोन क्र.2 येवलेवाडी स.नं.10 येथील फिनिक्स आर एम सी यांचे 100 चौ.मी., स.नं. 69 येथील प्रकाश पाटील व इतर यांचे 250 चौ.मी., स.नं.30 पानसरे नगर येथील 3760.38 चौ.मी असे एकूण 4110.38 चौ.मी. म्हणजेच (44244.13 चौ. फुट) क्षेत्र मोकळे करणेत आले. (PMC Anti-Encroachment Drive)

झोन क्र.4 घोरपडी स.नं.69, स.नं. 73 Hotel Saffron यांचे 1500 चौ. फुट, अंजली कवडे यांचे 1076 चौ. फुट, मुंढवा स.नं. 89 येथील चंद्रबहाद्दूर थापा व इतर यांचे 1356 चौ. फुट, राजू पिल्ले व इतर यांचे 4304 चौ. फुट, स.नं. 52, स.नं. 54 येथील डफळ व इतर यांचे 1355 चौ. फुट असे एकूण 9591 चौ. फुट. क्षेत्र मोकळे करण्यात आले.

ही कारवाई अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, जेसीबी, ब्रेकर, गॅस कटर इत्यादीच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Pune Kuswali Pathar | पुणे जिल्ह्यातील ‘हे’ ठिकाण होणार जागतिक पर्यटन केंद्र,
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्धार

Mandhardevi Kalubai Temple | मोठी बातमी : मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा
उद्यापासून 8 दिवस दर्शनासाठी बंद