PMC Anti-Encroachment Drive | पुणे महापालिकेकडून भांडारकर आणि विधी महाविद्यालय येथील अनधिकृत हॉटेलवर हातोडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Anti-Encroachment Drive | पुणे महापालिकेकडून Pune Municipal Corporation (PMC) शुक्रवारी (दि.25) भांडारकर आणि विधी महाविद्यालय (Law College) येथील जंक्शन वर असलेल्या हॉटेल सॅब्रोसवर (Hotel Sabros) बांधकाम विभागाचे वतीने कारवाई करण्यात आली. यावेळी सुमारे 2500 चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. (PMC Anti-Encroachment Drive)

या हॉटलवर यापुर्वी 3 वेळा कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही परत विनापरवाना बांधकाम (Unauthorized Construction) केले जात होते. यामुळे मालक आणि चालक यांचेवर फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्यासाठी पोलिसांना कळविण्यात आले असून दोन दिवसात गुन्हा दाखल केला जाईल. त्याच प्रमाणे या हॉटेलचा मद्य परवाना रद्द करण्यात यावा असे राज्य उत्पादन शुल्क विभागाला (State Excise Department) कळविण्यात येणार आहे, असे उप अभियंता सुनील कदम (Deputy Engineer Sunil Kadam) यांनी सांगितले. (PMC Anti-Encroachment Drive)

यावेळी सेनापती बापट रस्त्यावरील (Senapati Bapat Road) वेताळ बाबा चौक जवळील
नव्याने बांधण्यात येत असलेली 100 फुट × 50 फुट मापाची शेड पाडण्यात आली. या कारवाईत जेसीबी, गॅस कटर, 10 बिगारी इ. चा वापर करण्यात आला. ही कारवाई कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे (Executive Engineer Bipin Shinde), उप अभियंता सुनिल कदम, राहुल रसाळे यांच्या मार्फत करण्यात आली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mouni Roy | अभिनेत्री मौनी रॉयच्या बिकिनी फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग; मालदीवमध्ये करतीये व्हेकेशन एन्जॉय

Pune Crime News | अश्विनी क्लासिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून घरफोडी, कोंढव्यातील NIBM Road वरील घटना

Mera Bill Mera Adhikar द्वारे कसे जिंकू शकता १ कोटी रुपयांपर्यंत बक्षीस, जाणून घ्या पूर्ण पद्धत

Janhvi Kapoor | जान्हवीच्या क्रॉप टॉपने वेधले उपस्थितींचे लक्ष; फोटो व्हायरल