PMC बँक घोटाळा : HDIL च्या मालकांविरूध्द ED नं दाखल केले 7000 पानांचं ‘चार्जशीट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PMC बँक प्रकरणी बँक घोटाळ्यातील सक्तवसुली संचलनालयाने (ईडीने) सोमवारी सात हजार पानांचे आरोपपत्र विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केले आहे. ईडीने या प्रकरणी एचडीआयएलचे मालक राकेश वधावन आणि त्याच्या मुलगा सारंग वधावन यांना मुख्य आरोपी म्हणून दोषी ठरवले आहे.

ईडीने पीएमएलए कायद्याच्या अनेक तरतूदीअंतर्गत वधावन वडील आणि मुलाला ताब्यात घेतले आहे. या दोघांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. ईडीने पुढील तपासासाठी ऑक्टोबरमध्ये दोघांना ताब्यात घेतले होते. कंपनीने बँकेकडून 6700 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. सप्टेंबरमध्ये आरबीआयने पीएमसी खातेदारांना खात्यातून रक्कम काढण्यावर निर्बंध आणले होते. बँकेचे जवळपास 16 लाख खातेदार आहेत. बँकेचे एकूण कर्ज 9 हजार कोटी रुपयांचे आहे तर 11,610 कोटी रुपये जमा आहेत. या प्रकरणी आतापर्यंत बारा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यात पीएमसी बँकचे कर्मचारी देखील आहेत.

या प्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बँकेच्या अंतर्गत तपास गटाने सांगितले की पीएमसी बँकेच्या रेकॉर्डवरुन एकून 10.5 कोटी रुपये गायब आहेत.

चेक जमा केल्याशिवाय देण्यात आले पैसे –
या घोटाळ्यात आरोपी रियल असेस्ट कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि यासंबंधित कंपन्यांद्वारे जारी करण्यात आलेले अनेक चेक मिळाले, विशेष म्हणजे कंपनीने जारी केलेले चेक बँकेत जमा नाहीत. तरी देखील त्यांना रोख रक्कम देण्यात आली.

50 – 55 लाख रुपायांचा कोणताही हिशोब नाही –
बँकेच्या अंतर्गत गटांनी सांगितले की जे चेक मिळाले होते ते 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे आहेत. बाकीचे 50 – 55 लाख रुपयांचा कोणताही हिशोब नाही. मागील 2 वर्षात बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर जॉय थॉमस यांना एचडीआयएल आणि ग्रुपच्या कंपनींनी चेक पाठवले होते, जे जमा करण्यात आले नव्हते परंतू कंपनींना पैसे देण्यात आले आहेत. शक्यता आहे की थॉमसने 50 – 55 लाख रुपये आपल्याकडे ठेवले असावे.

एकूण कर्जाच्या 2/3 भाग एचडीआयएलचा –
या प्रकरणी सांगण्यात येत आहे की, ही आश्चर्याची बाब आहे की बँकेकडून वाटण्यात आलेले एकूण कर्जाच्या 2/3 टक्के भाग फक्त एका कंपनीचा आहे, बँक 2008 पासून घोटाळा करत आहे. मागील 10 वर्षात एचडीआयएलला पैसे देण्यासाठी बँकेने अनेक खोटी खाती सुरु केली होती.

बँकेचे संचालक वरयाम सिंह एचडीआयएल बोर्डमध्ये सहभागी होते, बँकेद्वारे एचडीआयएलला रिलेडेट पार्टी ट्रांजेक्शनच्या माध्यमातून किती कर्ज देण्यात आले होते याचा खुलासा झालेला नाही, जे नियमांच्या विरोधात आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/