PMC बँक घोटाळा : मुंबईत पुन्हा ED चे छापे, आढळलं एकदम ‘पॉश’ घर आणि ‘चार्टर्ड प्लेन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – HDIL शी संबंधित कथित 4,335 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सोमवारी अनेक छापे मारले. या करावाईत एचडीआयएलचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक राकेश कुमार वाधवान आणि सारंग वधाव यांच्या राहण्याचा आणि ऑफिसच्या ठिकाणी छापेमारी केली. ईडीला अलीबागमध्ये या कंपनीशी संबंधित 22 खोल्यांच्या घराबद्दल माहिती मिळाली. त्यांच्या एका विमानाची माहिती देखील ईडीला मिळाली. याशिवाय प्रमोटर्सकडे एक याक्ट असल्याची माहिती मिळाली, सध्या हे याक्ट मालदीवमध्ये आहे.

ईडी लवकरच हे याक्ट ताब्यात घेण्याचा प्रयत्नात आहे. छापेमारीत ईडीला माहिती मिळाली की एचडीआयएलच्या मालकांनी महाराष्ट्रात अनेक मोठ्या मोठ्या कॉलनीत नेत्यांना घर वाटली आहेत. परंतू ईडीने या नेत्यांचे नाव जाहीर करण्यास ईडीने नकार दिला आहे.

आर्थिक गुन्हा शाखेचा कारवाई –
मुंबईतील न्यायालयाने रविवारी पीएमसीचे माजी अध्यक्ष एस, वरयाम सिंह यांना 9 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी रात्री माहिम मध्ये सिंह यांना ताब्यात घेण्यात आणि रविवारी दंडाधिकाऱ्यांसमोर न्यायालयात हजर करण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की एचडीआयएल संबंधित 4,225 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी त्यांची चौकशी करत आहे. याआधी गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी एचडीआयएलचे अध्यक्ष राकेश कुमार वधवान आणि सारंग वधवान यांना ताब्यात घेत 3,500 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की वरयाम सिंह पीएमसी बँकेचे चेअरमन आणि एचडीआयएलचे कार्यकारी निदेशक देखील होती यामुळे पोलीस त्यांना इतर आरोपींबरोबर बसवून चौकशी करणार आहे.

Visit : Policenama.com