PMC घोटाळा : HDILच्या संचालकांच्या घरातून ‘रोल्स रॉयल्स’सह 12 ‘अलिशान’ गाडया जप्त
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पीएमसी आर्थिक बँक घोटाळ्याप्रकरणी माजी एमडी जॉय थॉमस यांना अटक केली आहे. या आधी या बँक घोटाळ्याप्रकरणी इडी ने सहा लोकांच्या घरावर छापेमारी केली होती. या घोटाळ्याप्रकरणी हाउसिंग डेव्हलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) च्या दोन संचालकांच्या घरी छापा टाकून कोट्यावधी रुपये आणि बारा लग्जरी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये रेंज रोवर, रोल्स रॉइस, बेंटले, बीएमडब्ल्यू, बलेनो, क्वालिस आणि मर्सिडीज बेंज सारख्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांची एकूण किंमत चाळीस कोटींपेक्षा अधिक आहे.
इडीने छापे मारलेल्या सहा ठिकाणांबाबत धक्कादायक खुलासे बाहेर आलेले आहेत. यात बांद्रा पश्चिम मधील वाधवन हाउसचा समावेश आहे. छापा टाकण्यात आलेल्यांपैकी आयपीएल मधील प्रसिद्ध टीम असलेल्या कोलकत्ता नाईट रायडरचे प्रायोजक राहिलेल्या एचडीआईएलचाही समावेश आहे.
यादरम्यान रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना घाबरून जाऊ नका असे आवाहन केले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, थॉमस यांना आर्थिक गुन्हे शाखेने तपासणीसाठी बोलवले होते त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
पीएमसी ने आपल्या कर्जातील एक मोठा हिस्सा एचडीआईएल कंपनीला दिला होता. बँकेचे 73 % पेक्षा अधिक कर्ज बुडले आहे. त्यामुळे बँकेने 3,500 कोटी रुपयांची एचडीआईएलची संपत्ती जप्त केली आहे.
31 मार्च, 2018 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेला सोपवण्यात आलेले कर्ज खात्यांच्या वितरणामध्ये पीएमसी ने एचडीआईएल आणि त्या संबंधीच्या 44 कर्ज खात्यांना 21,049 नकली कर्ज ( ऋण ) खात्यांमध्ये बदल करण्यात आले होते आणि असे सांगण्यात येत आहे की याबाबतची सर्व माहिती मार्गदर्शन मंडळ आणि अधिकाऱ्यांना होती.
visit : Policenama.com
- तारुण्य टिकविण्यासाठी तरूणांनी ‘हे’ खावे, व्यक्तीमहत्व खुलण्यासाठी आवश्य
- दम्याचा त्रास असेल तर घरातील ‘हा’ पदार्थ आहे रामबाण उपाय, जाणून घ्या
- मुलींमध्ये अठराव्या वर्षानंतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या, करा ‘हे’ उपाय
- पुरूषांनो, डोक्याला टक्कल पडली असेल तर करा ‘हे’ खास घरगुती उपाय
- महिलांनी ‘हे’ फळ खाल्ले तर येणार नाही ‘हार्टअटॅक’, हे आहेत आरोग्यदायी फायदे
- तुम्हाला ‘ही’ सवय असेल तर वेळीच व्हा सावध, हाडे होऊ शकतात ठिसूळ
- परीक्षेचे टेन्शन घेऊ नका, तणावमुक्त राहण्यासाठी अशी करा तयारी
- आरोग्यासह सौंदर्य प्रदान करणारे आहे ‘हे’ पारंपारिक पेय, नियमित प्या