PMC बँक घोटाळा : भाजपच्या माजी आमदारच्या मुलाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे माजी आमदार तारासिंग यांचे पुत्र रजनीत सिंग याला PMC बँक घोटाळ्याप्रकरणी काल शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली. रजनीत सिंग बँकेचा माजी संचालक आहे. हा गैरव्यवहार झाला, त्या वेळी ते बॅंकेच्या रिकव्हरी समितीवर कार्यरत होते. त्यांच्यावर हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या (एचडीआयएल) थकीत कर्जाबाबतची माहिती असल्याचा आरोप आहे. आज सुटीच्या न्यायालयात त्याला  हजर करण्यात येणार आहे.

रजनीत सिंग यांच्या अटकेमुळे पीएमसी प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 9 वर पोहोचली आहे. यापूर्वी याप्रकरणी बँकेचे  माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी संचालक वरियम सिंग, सुरजीत सिंग अरोरा, एचडीआयएलचे राकेश वाधवान व सारंग वाधवान व तीन लेखा परीक्षकांना अटक झाली होती.

गृहनिर्माण क्षेत्रातील ‘एचडीआयएल’ समूहाशी निगडित कर्जाच्या घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या ‘पीएमसी बँके’चे ठेवीदार अडचणीत आले आहेत. रिझर्व्ह बँकेने सुरूवातीला पैसे काढण्यावर कठोर बंधने आणली होती. एचडीआयएल समूहाला कर्ज देण्यात आलं तेव्हा रजनीत पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी ते कर्ज वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या समितीवरही होते. एचडीआयएल समूहातील कंपन्यांना कशाप्रकारे कर्ज देण्यात आले. हे कर्ज वसूल करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली, अशी विचारणा पोलिसांनी रजनीत यांच्याकडे केली. मात्र, रजनीत यांच्याकडून देण्यात आलेली उत्तरे आणि  स्पष्टीकरण असमाधानकारक होते. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like