PMC Bank चे USFB मध्ये होणार विलीनीकरण, ‘पीएमसी’च्या ग्राहकांना 10 वर्षात मिळणार पूर्ण पैसे

नवी दिल्ली : PMC Bank | पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या (PMC Bank) ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने 22 नोव्हेंबरला पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेचे विलीनीकरण यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेत (USFB) करण्याच्या ड्राफ्ट स्कीमची घोषणा केली आहे.

 

या ड्राफ्टनुसार, PMC Bank ची मालमत्ता आणि दायित्वे (असेट्स आणि लायबिलिटीज) USFB वर येतील. यामध्ये पीएमसी बँकेच्या ग्राहकांचे पैसे परत करण्याचा सुद्धा समावेश आहे. USFB सोबत विलीनीकरनाच्या डीलमध्ये अशा अटींचा यासाठी समावेश करण्यात आला आहे कारण ग्राहकांची रक्कम सुरक्षित राहावी.

 

काय म्हटले RBI ने, जाणून घ्या

RBI ने म्हटले, हे पाहू शकता की, USFB 1100 कोटी रुपयांच्या भांडवलासह सेटअप बनवत आहे, तर रेग्युलेटरी नियमानुसार स्मॉल फायनान्स बँकेसाठी केवळ 200 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

 

ड्राफ्ट स्कीमच्या अंतर्गत 1900 कोटी रुपयांचा इक्विटी वॉरंट आहे, ज्याचा वापर 8 वर्षांच्या कालावधीत कधीही केला जाऊ शकतो. हे इक्विटी वॉरंट 1 नोव्हेंबर 2021 ला यूनिटी स्मॉल फायनान्स बँकेला जारी केले आहे. आरबीआयने या ड्राफ्ट स्कीमवर 10 डिसेंबरपर्यंत सुचना मागितल्या आहेत. यावर अंतिम निर्णय त्यानंतर घेतला जाईल.

 

PMC Bank च्या ग्राहकांना अशाप्रकारे मिळतील पैसे?

पीएमसी बँकेत ज्या ग्राहकांचे पैसे अडकले आहेत, त्यांना पुढील तीन ते 10 वर्षाच्या आत पूर्ण पैसा परत मिळेल.
आरबीआयच्या ड्राफ्ट स्कीमनुसार, USF बँक 5 लाख रुपयांची गॅरेंटेड रक्कम डिपॉझिटर्सला देईल.

 

त्यानंतर बँक, दोन वर्षानंतर 50 हजार रुपये, तीन वर्षानंतर 1 लाख रुपये, 4 वर्षानंतर 3 लाख रुपये,
5 वर्षानंतर 5.5 लाख रुपये आणि 10 वर्षानंतर पूर्ण अमाऊंट ग्राहकांना देईल.

 

Web Title :- PMC Bank | rbi issues draft scheme for takeover of pmc bank by unity small finance bank

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा