24 तासाच्या आत PMC बँकेच्या आणखी एका खातेदाराचा हार्ट अटॅकनं मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संजय गुलाटी यांच्या मृत्यू नंतर आणखी एका खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फट्टो पंजाबी यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या व्यक्तीचे खाते मुलुंड शाखेत होते. पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर संजय गुलाटी यांचा देखील हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. यानंतर गुलाटी यांच्या परिवाराने पीएमसी बँकेला जबाबदार धरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 51 वर्षीय संजय गुलाटी सोमवारी बँकेच्या विरोधातील एका रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्या ठिकाणी त्यांनी बँक खातेधारकांना आणि गुंतवणूकदारांना आपल्याच पैशांबाबत हताश झालेले पाहिले. त्यानंतर ते प्रचंड तणावाखाली आले. घरी आल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले आणि सायंकाळी त्यांचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू झाला होता.

मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, चेअरमन वरियम सिंग आणि बँकेचे काही पदाधिकारी यांचा समावेश आहे. बँकेचे पदाधिकारी आणि संचालक यांनी ऑगस्ट 2008 ते 2019 या कालावाधीत भांडुपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची परतफेड होत नसताना ही माहिती आरबीआयपासून लपवली. कमी रकमेचा अर्ज, बनावट कर्ज खात्यांचा खोटा अभिलेख तयार करुन आरबीआयला माहिती सादर केली. या सगळ्यामुळे 4335 कोटी रुपयांचे नुकसान बँकेला झाले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी