6500 कोटी पेक्षा अधिक रक्कमेचा आहे PMC बँक घोटाळा, 10.5 कोटी कॅशचं रेकॉर्डचं नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पीएमसी घोटाळ्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, तपासणी करणाऱ्या टीमने दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या रेकॉर्ड मधून १० कोटींपेक्षा अधिक कॅश गायब आहे. तसेच तपासणीसाठी छापा मारल्यानंतर बँकेत काही एचडीआईएल (HDIL) आणि त्यांच्याशी निगडित अन्य कंपन्यांचे चेक सापडले आहेत ज्यांना कधी डिपॉझीटच केले गेले नाही म्हणजेच हे चेक जमा न करताच या कंपन्यांना पैसे दिले जात होते. त्यामुळे आता हा घोटाळा 4355 कोटींचा नाही तर 6500 कोटीपेक्षा जास्त झाला आहे.

मिळलेल्या चेक वरून दहा कोटींची हेराफेरी झाली असल्याचे समजते तर 50 लाखांचा आतापर्यंत हिशोब लागलेला नाही. त्यामुळे आता या घोटाळ्याच्या आकडेवारीत भर पडली आहे. तपासानुसार हे समजते की, एचडीआईएल कंपनीला कॅश हवी होती आणि या आधीचे चेअरमन जॉय थॉमस यांनी कंपनीला कॅश दिली मात्र चेक जमा केले नाही. बँकेच्या रेकॉर्डमध्ये याबाबतची कोणतीही एन्ट्री नाही.

माजी अधिकारी अरोडा यांना अटक तर थॉमस यांना 14 दिवसांची कोठडी –

मुंबई पोलिसांनी पीएमसीच्या सुरजीत सिंह अरोड़ा नामक माजी अधिकाऱ्याला बुधवारी अटक केली. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. याआधी देखील अरोडा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ते पीएमसी बँकेत निर्देशक आणि लोन कमिटीचे सदस्य सुद्धा होते. या घोटाळ्याप्रकरणी एचडीआईएल ग्रुपचे राकेश आणि सारंग वाधवान, पीएमसीचे माजी चेअरमन वरयाम सिंह आणि बँकेचे माजी अधिकारी जॉय थॉमस यांना यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. तर न्यायालयाने थॉमस यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या