PMC बँकेच्या खातेदारांसाठी खुशखबर ! RBI नं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संकटात सापडलेल्या बँक तसेच वित्त संस्थेतील ठेवीदारांच्या हिताचे रक्षण ही प्राथमिकता आहे. मात्र त्याचबरोबर संस्थेला भक्कमपणे पुन्हा उभे करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचा पर्याय स्वीकारण्याचा यशस्वी प्रयत्न येस बँकेमध्ये केला आहे. हेच माॅडेल पंजाब अँड महाराष्ट्र बँकेच्या पुनर्रचनेसाठी अवलंबले जाईल, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. ‘पीएमसी’ बँकेच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे, हि खातेदारांसाठी दिलासादायक बाब आहे.

‘एसबीआय’च्या ७ व्या बँकिंग अँड इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये शनिवारी आयोजित पहिल्या सत्रात दास बोलत होते. दास यांच्या भाषणाने या वेबिनारची सुरुवात झाली.

कोरोना संकटाने आर्थिक नुकसानिचा रिझर्व्ह बँक आढावा घेत आहे. या संकटातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी किमान स्तरावर व्याज ठेवणे, महागाई आटोक्यात आणणे, रोकड उपलब्ध सुलभता राखणे यासारख्या उपाययोजना केल्या जातील, असे दास यांनी स्पष्ट केले.

दास यांनी भाषणात आर्थिक घडामोडींचा आढावा घेतला. कोरोना विषाणूने भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा आघात केला आहे. विकास दर निचांकी स्तरावर गेलाय. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात कठोर लॉकडाउन लागू केला होता. या काळात औद्योगिक क्षेत्रातील चाके मंदीत रुतली आहेत. बेरोजगारी वाढली असून त्याचा परिमाण कर्जफेडीवर झाला. मात्र, कोरोना संकटातील सवलती बंद करण्याचा तूर्त विचार नाही, असे दास यांनी हे देखील स्पष्ट केले.