PMC Budget | पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक सादर करण्यावरून रंगले राजकारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेचे 2022-23 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक (PMC Budget) सादर करण्यावरून राजकारण (Politics) रंगले आहे. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) कायदेशीर तरतुदीकडे (Legal Provisions) लक्ष वेधत सत्ताधारी भाजपकडून (BJP) अंदाजपत्रक सादर (PMC Budget) करण्याच्या प्रयत्नाला खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. तर सोमवारी स्थायी समितीसमोर (Standing Committee) अंदाजपत्रक सादर करून ते मंजुर करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपचा असल्याची चर्चा सुरु आहे.

 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी नुकतेच महापालिकेचे सुमारे साडे आठ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर (PMC Budget) केले होते. आयुक्तांकडून हे अंदाजपत्रक स्थायी समितीस सादर करण्यास सुमारे दोन ते अडीच महिने इतका उशीर झाला आहे. विद्यमान सहभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपत आहे. यापार्श्वभुमीवर सत्ताधारी भाजपकडून पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मांडून ते मान्य करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर बुधवारी स्थायी समितीसमोर चर्चा सुरु झाली. या बैठकीत अंदाजपत्रकावरील राजकारणाचा पहीला अंक पार पडला.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) सदस्य आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे (Corporator Vishal Tambe) यांनी स्थायी समितीने तयार केलेले अंदाजपत्रक मुख्य सभेच्या पुढे मांडण्यासाठी कायद्यात काय तरतुद आहे ? याची माहीती नगर सचिवांना विचारली. नगरसचिव शिवाजी दौंडकर (Shivaji Daundkar) यांनी स्थायी समितीला माहीती देताना ‘महाराष्ट्र महापालिका अधिनियम प्रकरण दोन नुसार सदर अंदाजपत्रक हे मुख्य सभेपुढे मांडण्यासाठी सात दिवसांची नोटीस देऊन सभा बोलवावी लागणार आहे,’ असे नमूद केले. नगरसचिवांनी दिलेल्या या माहीतीच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य तांबे, अश्विनी कदम (Ashwini Kadam), प्रदीप गायकवाड (Pradip Gaikwad), माजी महापौर दत्तात्रय धनकवडे (Former Mayor Dattatraya Dhanakwade), शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांनी पत्रकार परीषदेत पक्षाची भुमिका स्पष्ट केली.

विद्यमान सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपत असल्याने या स्थायी समितीला हे अंदाजपत्रक तयार करून ते मुख्यसभेच्या मंजुरीसाठी पाठविता येणार नाही.
बुधवारी स्थायी समितीत अंदाजपत्रकावर चर्चा सुरु झाली होती. परंतु ही सभा सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर सोमवार 14 मार्चपर्यंत तहकुब केली.
या तहकूबीला आम्ही विरोध केला होता. जर स्थायी समितीत आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर चर्चाच करायची होती,
तर त्यांना आम्ही समितीची बैठक गुरुवारी दुपारपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तहकुबी दिली होती.
ती देखील बहुमताच्या जोरावर सत्ताधारी भाजपने फेटाळून लावली.
बुधवारी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (PMC Standing Committee Chairman Hemant Rasane)
हे देखील पुर्णवेळ बैठकीला उपस्थित राहीले नाही.

 

Web Title :- PMC Budget | Politics colored by the presentation of Pune Municipal Corporation’s budget

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Raj Thackeray In Pune | … म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करावी – राज ठाकरे (व्हिडिओ)

 

Yamini Malhotra Nude Photoshoot | ‘ही’ सौंदर्यवती आहे टेलिव्हिजनवरील सर्वात बोल्ड अभिनेत्री, तिनं कित्येकदा केलं आहे न्यूड फोटोशूट

 

New Cricket Rules | ‘कॅच पकडला अन्…’; क्रिकेटच्या नियमात झाले मोठे बदल! वाचा सविस्तर