PMC Building Development Permission | पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे ऐतिहासिक उत्पन्न ! तब्बल 2 हजार कोटीचे मिळवले उत्पन्न; अंदाजपत्रकाच्या सुमारे 170 % उत्पन्न मिळवित रचला ‘इतिहास’

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – PMC Building Development Permission | कोरोना काळामध्ये मागील दोन वर्षात बांधकाम व्यवसायाला फटका बसला असला तरी दुसर्‍या लाटेनंतर हा व्यवसाय पुर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाने (Maharashtra Government) कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम व्यवसायाला (Construction Business) चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कामध्ये (Stamp Duty) दिलेली सवलत तसेच नवीन बांधकाम नियमावलीची (Unified DC Rules) अंमलबजावणी यामुळे पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) बांधकाम विभागाला २०२१-२२ या आर्थिक वर्षात तब्बल २ हजार २ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष असे की स्थायी समितीने ठेवलेल्या उद्दीष्टापेक्षा सुमारे १७० टक्के उत्पन मिळाले असून हे उत्पन्न आतापर्यंतचा उच्चांक ठरले आहे. (PMC Building Development Permission)

 

महापालिकेच्या २०२१-२२ यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये (PMC Budget) १ हजार १८५ कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले होते. २०१६-१७ या वर्षापासून बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उत्पन्न सहाशे ते सातशे कोटी रुपयांपर्यंत सिमित होते. मार्च २०२० मध्ये कोरोना आणि लॉकडाउनचा फटका या क्षेत्राला बसला. यामुळे हे उत्पन्न ५०७ कोटी रुपयांपर्यंत खाली आले होते. दरम्यान, मागीलवर्षी राज्य शासनाने युनिफाईड डीसी रुल्स लागू केले. तसेच ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिल्याने बांंधकाम परवानगीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव दाखल झाले. या आर्थिकवर्षात नवीन ६९८ प्रस्तावांसह २ हजार ७७५ बांधकाम प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यातून बांधकाम विभागाला २ हजार २ कोटी रुपये महसुल मिळाला आहे. (PMC Building Development Permission)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

यासंदर्भात माहिती देताना महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे (PMC City Engineer Prashant Waghmare ) यांनी सांगितले, की उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत असून नवीन बांधकाम परवानगी देण्यासाठी स्वतंत्र ऍटो डी.सी.आर. कक्ष सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या २०१७ च्या बांधकाम विकास नियमावलीमध्ये बाल्कनी, जिना यावर आकारण्यात आलेले शुल्क रद्द करण्यात आले होते. तसेच टेरेस, पॅसेज, लिफ्ट यासाठी आकारण्यात येणारे शुल्क प्रिमियम शुल्क म्हणून उत्पनतमिळत होते. राज्य शासनाने २०२० मध्ये युनीफाईड बांधकाम नियमावली लागू करताना पी लाईन संकल्पना सुरू केली. तसेच मूळ एफ.एस.आय. वर रेडी रेकनर दराच्या १५ टक्के शुल्क आकारून ऍन्सिलरी एफ.एस.आय. ही संकल्पना नव्याने अंतर्भुत केली आहे. यामुळे उत्पन्न वाढीसाठी मोठा हातभार लागला आहे.

 

पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांमध्ये पीएमआरडीएच्यावतीने बांधकाम परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. या परवानगीपोटी पीएमआरडीएला ३०० कोटी रुपये महसुल मिळाला आहे. या गावांमध्ये मुलभूत सुविधा महापालिकेच्यावतीने देण्यात येत आहेत. या गावांमध्ये मुलभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी पीएमआरडीए कडून या गावांतील बांधकाम शुल्कापोटी मिळालेले ३०० कोटी रुपये महापालिकेला मिळावेत,यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.

 

– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका.

पालिकेचे उत्पन्न ६ हजार कोटी रुपयांपुढे
महापालिकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये ६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.
यामध्ये उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या बांधकाम विभागातून २ हजार कोटी, मिळकत करातून १ हजार ८४६ कोटी,
जीएसटीच्या हीश्यापोटी १ हजार ८५० कोटी, शासनाकडून मुद्रांक शुल्क, LBT तसेच मालमत्ता विभागाकडून सुमारे २०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.
कोरोनासारख्या प्रतिकुल परिस्थितीतही महापालिकेने गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १ हजार ४०० कोटी रुपयांहून अधिकचे उत्पन्न मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

 

Web Title :- PMC Building Development Permission | Historical income of construction department of Pune Municipal Corporation! Revenue of Rs 2,000 crore; ‘History’ made up about 170% of the budget.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rubina Dilaik Gorgeous Look | रुबीना दिलैकच्या सुपरबोल्ड अदांवर चाहते झाले फिदा, पाहा व्हायरल फोटो…

 

Nana Patole | ‘सतीश उकेंकडील महत्त्वाच्या फाईल्स जप्त करण्यासाठीच ED ने धाड टाकली – नाना पटोले

 

Miss Universe Harnaaz Kaur Sandhu | वाढलेल्या वजनामुळं सौंदर्यवती Miss Universe हरनाझ कौर संधू ट्रोल..