PMC CBSE School | पुण्याच्या बालेवाडीत सुरू होणार महापालिकेची पहिली सी.बी.एस.सी. बोर्डाची शाळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   PMC CBSE School | महापालिकेच्या मराठी माध्यमांतील शाळांतील विद्यार्थी गळती सुरू असताना पालिकेच्याच परंतू विनाअनुदानित इंग्रजी प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील शैक्षणिक वर्षामध्ये खाजगी सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महापालिका (Pune Corporation) बालेवाडी (balewadi) येथे सी.बी.एस.सी. बोर्डाच्या शाळेचे (PMC CBSE School) नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करणार आहे.

 

महापालिकेने बालेवाडी येथील स.नं. ५ व १९ येथे शाळेची इमारत विकसित केली आहे.
या इमारतीमध्ये सी.बी.एस.सी. बोर्डाचे नववी व दहावीचे विनाअनुदानीत वर्ग (PMC CBSE School) सुरू करण्यात येणार आहेत.
यासाठी सी.बी.एस.सी. शाळां व संस्थांकडून संयुक्त प्रकल्पाअंतर्गत हे वर्ग सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत.
यामध्ये १५ वर्षांपेक्षा अधिक काळ शाळा चालविण्याचा अनुभव असलेल्या शाळांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या संस्थां नियमानुसार आर्थिकदृष्टया सक्षम असाव्यात.
महापालिकेच्या हद्दीतील ५० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य राहाणार असून यापैकी ३० टक्के विद्यार्थी महापालिकेच्या शाळेतील व २० टक्के विद्यार्थी दारिद्ˆय रेषेखालील असतील.
या विद्यार्थ्यांना शिक्षण व अन्य सुविधा मोफत उपलब्ध करून देेणे संबधित संस्थांसाठी बंधनकारक असेल.
उर्वरीत ५० टक्के प्रवेश हे सोडतीतून देणे बंधनकारक तसेच त्यांच्याकडून शासन नियमानुसारच फी आकारण्याची संस्थेस मुभा देण्यात येणार आहे.
महापालिकेच्यावतीने वर्गखोल्या, खेळाचे मैदान, स्वच्छतागृह व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संस्थेसोबत ३० वर्षांचा करार करण्यात येणार असून प्रवेशामध्ये शिथिलता तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास संबधित संस्थेवर कारवाईचे अधिकार महापालिका आयुक्तांना राहाणार आहेत.
या शाळेसाठीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सर्व दायित्व हे संबधित संस्थांकडेच राहाणार आहे.
या सर्व अटीशर्तींसह आवश्यक पुर्तता करणार्‍या संस्थांकडून महापालिकेने (PMC CBSE School) नुकतेच अर्जही मागविले आहेत.

 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बालेवाडी येथे सी.बी.एस.सी. बोर्डाची शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
त्यानुसार महापालिकेने खाजगी सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सी.बी.एस.सी. बोर्डाची शाळा चालविण्यासंदर्भात प्रस्ताव मागविले आहेत.

 

– शिवाजी दौंडकर (शिक्षण अधिकारी, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण, पुणे महापालिका)
(Shivaji Daundkar, Education Officer, Secondary and Technical Education, Pune Municipal Corporation)

 

Web Title : PMC CBSE School | Municipal Corporation’s first CBSC will start in Balewadi, Pune. Board School

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 58 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bank Holidays | नोव्हेंबर महिन्यात बँकांना जास्त दिवस सुट्टी, ‘या’ कॅलेंडरच्या हिशेबाने करा प्लानिंग

Instagram ने दिले नवीन फीचर, आता कुणीही शेयर करू शकतो आपली स्टोरी