Coronavirus Impact : पुण्यातील ‘गुलटेकडी ते आरटीओ’ कार्यालया दरम्यानचा परिसर ‘सील’ करण्यासंदर्भात ‘हालचाली’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने संपुर्ण जगात थैमान घातलं आहे. देशात देखील आतापर्यंत 109 हून अधिक लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. पुण्यात आतापर्यंत कोरानामुळं 5 जणांचा बळी गेला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांची शहरातील संख्या वाढली असल्याने महापालिका प्रशासनानं शहरातील काही परिसर सील करण्यासंदर्भातील हालचाली सुरू केल्या आहेत.

गुलटेकडी ते आरटीओ कार्यालया दरम्यानचा परिसर सील बंद करण्यासाठी मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी नकाशा पुणे पोलिसांकडे पाठविला आहे. त्यावर अद्यापही चर्चा चालु आहे. मात्र, गुलटेकडी ते आरटीओ कार्यालया दरम्यानचा परिसर लवकरच सील बंद करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. अद्याप त्यावर निर्णय होणे बाकी आहे. मात्र, मनपा आणि पोलिस प्रशासनाकडून त्यासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. तो परिसर किती दिवसांसाठी सील राहिल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मनपा आणि पुणे पोलिसांकडून यासंदर्भातील माहिती लवकरच देण्यात येतील असे सांगण्यात येत आहे.