PMC Draft ward Structure | पुणे महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Draft ward Structure | पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना उद्या जाहीर होणार असली तरी त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणता प्रभाग (Ward) कसा होणार याची सध्या चर्चा रंगू लागली आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Pune Municipal Election) शहरातील पहिला प्रभाग हा धानोरी-विश्रांतवाडी असणार आहे. तर शेवटचा 58 क्रमांकाचा प्रभाग हा कात्रज-गोकुळनगर असणार आहे. दरम्यान, अशा प्रकारची यादी सोशल मीडियावर (Social Media) सोमवारी सायंकाळपासून व्हायरल होत आहे. (PMC Draft ward Structure)

 

पुणे महानगर पालिकेमध्ये नुकतेच 23 गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या नावानेही 10 प्रभाग तयार झाले आहेत. याशिवाय यामध्ये प्रस्थापित नगरसेवकांचे (Corporator), पक्षनेते (Party Leader) व पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सुरक्षित असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या यादीवरुन स्पष्ट होत आहे. (PMC Draft ward Structure)

 

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) पुणे महापालिकेला 1 फेब्रुवारी रोजी प्रारुप आराखडा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. यावर 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती (Objection) आणि सूचना (Suggestion) मागवण्यास सांगितले आहे. यानंतर 2 मार्च रोजी अंतिम प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. पुणे महापालिकेची प्रभाग रचना ही वादाची आणि डावपेचांची झालेली आहे. पुणे महापालिकेसह निवडणूक आयोगाकडे ही अनेक बदल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची चर्चा आहे. राज्यात सर्वात अवघड प्रश्न पुण्यात असल्याचे अधिकारी खासगीमध्ये बोलत आहेत.

 

पुणे महापालिकेकडून एक फेब्रुवारीला रात्री 12 वाजता पालिकेच्या संकेतस्थळावर लिंक ओपन करुन दिली जाणार आहे. याठिकाणी प्रभाग रचना नाव व चतुर सीमा नकाशा नागरिकांना पाहण्यास मिळणार आहे.

पुण्यातील हे आहेत प्रभाग

1. धानोरी-विश्रांतवाडी (Dhanori-Vishrantwadi)

2. टिंगरेनगर-संजय पार्क (Tingre Nagar-Sanjay Park)

3. लोहगाव- विमान नगर (Lohgaon- Viman Nagar)

4. वाघोली -इऑन आयटी पार्क (Wagholi – Ion IT Park)

5. खराडी-चंदननगर (Kharadi-Chandan Nagar)

6. वडगावशेरी (Wadgaon Sheri)

7. कल्याणी नगर-नागपूर चाळ (Kalyaninagar-Nagpur Chawl)

8. कळस-फुलेनगर (Kalas-Phulenagar)

9. येरवडा (Yerawada)

10. शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी (Shivajinagar Gaothan-Sangamwadi)

11. बोपोडी-पुणे विद्यापीठ (Bopodi-Pune University)

12. औंध-बालेवाडी (Aundh-Balewadi)

13. बाणेर-सुस म्हाळुंगे (Baner-Sus Mahalunge)

14. पाषाण- बावधन बुद्रुक (Pashan- Bavadhan Budruk)

15. पंचवटी – गोखलेनगर (Panchavati – Gokhalenagar)

16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे (Fergusson College – Erandwane)

17. शनिवार पेठ- राजेंद्रनगर (Shaniwar Peth- Rajendra Nagar)

18. शनिवार वाडा – कसबा पेठ (Shaniwar Wada – Kasba Peth)

19. रास्ता पेठ-के.ई.एम. हॉस्पिटल (Rasta Peth-KEM Hospital)

20. पुणे स्टेशन- ताडीवाला रोड (Pune Station – Tadiwala Road)

21. मुंढवा-घोरपडी (Mundhwa-Ghorpadi)

22. मांजरी-शेवाळवाडी (Manjari-Shewalwadi)

23. साडेसतरानळी- आकाशवाणी (Sadesatranali- Akashwani)

24. मगरपट्टा- साधना विद्यालय (Magarpatta- Sadhana Vidyalaya)

25. हडपसर गावठाण-सातववाडी (Hadapsar Gaothan-Satavwadi)

26. भीम नगर-रामटेकडी (Bhimnagar-Ramtekdi)

27. कासेवाडी-हरकानगर (Kasewadi-Harkanagar)

28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट (Mahatma Phule Smarak – Timber Market)

29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई (Khadakmal Aali – Mahatma Phule Mandai)

30. जयभवानी नगर – केळेवाडी (Jayabhavani Nagar – Kelewadi)

31. कोथरुड गावठाण -शिवतीर्थ नगर (Kothrud Gaothan – Shivtirtha Nagar)

32. भुसारी कॉलनी-सुतारदरा (Bhusari Colony-Sutardara)

33. बावधन खुर्द-महात्मा सोसायटी (Bavadhan Khurd-Mahatma Society)

34. वारजे-कोंढवे धावडे (Warje-Kondhve Dhavade)

35. रामनगर-उत्तमनगर शिवणे (Ramnagar-Uttamnagar shivne)

36. कर्वेनगर (Karvenagar)

37. जनता वसाहत-दत्तवाडी (Janata Vasahat-Dattawadi)

38. शिवदर्शन-पद्मावती (Shivdarshan-Padmavati)

39. मार्केटयार्ड-महर्षी नगर (Market Yard-Maharshi Nagar)

40. गंगाधाम-सॅलिसबरी पार्क (Gangadham-Salisbury Park)

41. कोंढवा खुर्द – मिठानगर (Kondhwa Khurd – Mithanagar)

42. सय्यदनगर-लुल्लानगर (Sayyadnagar-Lulla Nagar)

43. वानवडी-कौसरबाग (Wanwadi-Kausar Bagh)

44. काळेपडळ-ससाणेनगर (Kale Padal-Sasane Nagar)

45. फुरसुंगी (Fursungi)

46. मोहम्मदवाडी-उरुळी देवाची (Mohammadwadi-Uruli Devachi)

47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी (Kondhwa Budruk – Yewalewadi)

48. अप्पर सुपर इंदिरानगर (Upper Super Indiranagar)

49. बालाजी नगर – के के मार्केट (Balaji Nagar – KK Market)

50. सहकारनगर-तळजाई (Sahakar Nagar-Taljai)

51. वडगाव-पाचगाव पर्वती (Wadgaon-Pachgaon Parvati)

52. नांदेड सिटी-सनसिटी (Nanded City-Sun City)

53. खडकवासला-नऱ्हे (Khadakwasla-Narhe)

54. धायरी- आंबेगाव (Dhayari- Ambegaon)

55. धनकवडी-आंबेगाव पठार (Dhankawadi-Ambegaon Pathar)

56. चैतन्यनगर-भारती विद्यापीठ (Chaitanyanagar-Bharati Vidyapeeth)

57. सुखसागर नगर-राजीव गांधी नगर (Sukhsagar Nagar-Rajiv Gandhi Nagar)

58. कात्रज-गोकुळनगर (Katraj-Gokulnagar)

 

 

Web Title :- PMC Draft ward Structure | Names of 58 wards of Pune Municipal Corporation’s model ward structure

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादयक! राज्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,140 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Rajesh Tope | ‘कोरोना’ची लाट कधी ओसरणार? आरोग्य मंत्र्यांची दिलासादायक माहिती, म्हणाले…

 

Pune Crime | पुण्यातील एच. पी ज्वेलर्समध्ये दागिन्यांवर डल्ला मारणारी महिला गजाआड