PMC Election 2022 | पुणे महापालिका निवडणूक ! महापालिका व शहर पोलिस दलासोबत चर्चा करून ‘आढावा’ घेतला

PMC Election 2022 | Pune Municipal Election 2022 ! After discussing with the Pune Municipal Corporation and the pune city police force, he took a 'review'
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Election 2022 | ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Political Reservation In Maharashtra) राज्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court ) दिल्याने यंत्रणा कामाला लागली आहे. पुणे महाापलिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) वरिष्ठ अधिकार्‍यांनी (PMC Officers) तातडीने पोलिस अधिकार्‍यांसोबत (Pune Police) प्राथमिक चर्चा करून निवडणूक यंत्रणा व बंदोबस्ताबाबत आढावा घेतला. (PMC Election 2022)

 

ओबीसी आरक्षणावरून राज्यातील १४ महापालिकांसह अनेक नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. विशेष असे की, राज्याच्या विधीमंडळाने राज्यातील ओबीसींचा डाटा मिळेपर्यंत या निवडणुका तूर्तास लांबविण्यासाठी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधिकार निवडणूक आयोगाकडून सरकारकडे घेतल्याने निवडणुका लांबणार हे निश्‍चित झाले होते. यामुळेच मागील महिन्यांत बरखास्त झालेल्या मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर या महापालिकांसह तब्बल १४ महापालिका तसेच अनेक जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक नेमण्यात आले आहेत. दरम्यान शासनाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांवर आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसारच करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. (PMC Election 2022)

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्थानीक स्वराज्य संस्थांतील प्रशासकांनी लागलीच निवडणुकीची तयारी देखिल सुरू केली आहे. पुणे महापालिकेने नेहमी फेब्रुवारी, मार्चमध्ये होणार्‍या निवडणुकांच्या अनुषंगाने यापुर्वीच तयारी केली आहे. मात्र, मध्यंतरी राज्य शासनाने निवडणुकीचे अधिकार स्वत:कडे घेतल्यानंतर तयारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच शांत होते. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने महापालिका अधिकार्‍यांनी निवडणुकीच्या दृष्टीने थंड बस्त्यात असलेली कार्यवाही पुन्हा सुरू केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील दोन महिन्यांत निवडणुका झाल्यास मतदान केंद्र, मनुष्यबळ, वाहन व्यवस्था व अन्य साधन सामुग्रीचा आढावा घेतला. एवढेच नव्हे तर मतदान केंद्रांनिहाय लागणारा पोलिस बंदोबस्त, वाहन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी शहर पोलिसांशी अनौपचारीक चर्चा करून गतीने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

 

स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोग महापालिकांना आदेश देईल.
हे आदेश अद्याप महापालिकेला मिळालेले नाहीत. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

– विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar)

 

Web Title :- PMC Election 2022 | Pune Municipal Election 2022 ! After discussing with the Pune Municipal Corporation and the pune city police force, he took a ‘review’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts
Maharashtra Assembly Election 2024 | sanjeevraje naik nimbalkar and deepak chavan join sharad pawar group ramraje nimbalkar not campaign for mahayuti

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’