PMC Elections 2022 | पुणे महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत 20 प्रभागांची नावे बदलली; जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Elections 2022 | राज्यातील मुदत समाप्त झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची (Maharashtra Municipal Election 2022) चर्चा सुरू आहे. अशातच पुण्यात राजकीय वातावरण तंग झालं असल्याचं दिसत आहे (Pune Political News) . निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी प्रत्येक राजकीय पक्ष आपली मोट बांधण्यास सज्ज झाला आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठीच्या (PMC Elections 2022) अंतिम प्रभाग रचनेची यादी (PMC Final Ward Structure List) जारी केली आहे. मात्र, या यादीमधील एकूण 20 प्रभागांच्या नावात (Prabhag Name Changes) बदल झाला आहे. Pune Municipal Corporation (PMC)

 

सध्या होणारी निवडणूक ही त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. दरम्यान, प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून या निवडणुकीसाठी एकूण 58 प्रभाग आहेत. त्यामधील 20 प्रभागाच्या नावात बदल झाला आहे. (PMC Elections 2022)

 

20 प्रभागांची नवी नावे (Name Of Prabhag – Ward)

1. प्रभाग क्रमांक – 4 – पूर्व खराडी – वाघोली (East Kharadi – Wagholi)

2. प्रभाग क्रमांक – 5 – पश्चिम खराडी – वडगांवशेरी (West Kharadi – Wadgaon Sheri)

3. प्रभाग क्रमांक – 6 – वडगांवशेरी – रामवाडी (Wadgaon Sheri – Ramwadi)

4. प्रभाग क्रमांक – 11 – बोपोडी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Bopodi – Savitribai Phule Pune University)

5. प्रभाग क्रमांक – 15 – पंचवटी – गोखलेनगर (Panchavati – Gokhalenagar)

6. प्रभाग क्रमांक – 17 – शनिवार पेठ – नवी पेठ (Shaniwar Peth – Navi Peth)

7. प्रभाग क्रमांक – 19 – छत्रपती शिवाजी महाराज मैदान – रास्ता पेठ (Chhatrapati Shivaji Maharaj Maidan – Rasta Peth)

8. प्रभाग क्रमांक – 20 – पुणे स्टेशन – मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता (Pune Station – Matoshri Ramabai Ambedkar Road)

9. प्रभाग क्रमांक – 21 – कोरेगांव पार्क – मुंढवा (Koregaon Park – Mundhwa)

10. प्रभाग क्रमांक – 22 – मांजरी बुद्रुक – शेवाळवाडी (Manjari Budruk – Shewalwadi)

11. प्रभाग क्रमांक – 26 – वानवडी गावठाण – वैदुवाडी (Wanwadi Gaothan – Vaiduwadi)

12. प्रभाग क्रमांक – 27 – कासेवाडी – लोहियानगर (Kasevadi – Lohianagar)

13. प्रभाग क्रमांक – 28 – महात्मा फुले स्मारक – भवानी पेठ (Mahatma Phule Smarak – Bhavani Peth)

14. प्रभाग क्रमांक – 29 – महात्मा फुले मंडई – घोरपडे पेठ उद्यान (Mahatma Phule Mandai – Ghorpade Peth Udyan)

15. प्रभाग क्रमांक – 32 – भुसारी कॉलनी – बावधन खुर्द (Bhusari Colony – Bavdhan Khurd)

16. प्रभाग क्रमांक – 33 – आयडियल कॉलनी – महात्मा सोसायटी (Ideal Colony – Mahatma Society)

17. प्रभाग क्रमांक – 40 – बिबवेवाडी – गंगाधाम (Bibwewadi – Gangadham)

18. प्रभाग क्रमांक – 44 – काळे – बोराटे नगर – ससाणे नगर (Kale – Borate Nagar – Sasane Nagar)

19. प्रभाग क्रमांक – 49 – बालाजीनगर – शंकर महाराज मठ (Balajinagar – Shankar Maharaj Math)

20. प्रभाग क्रमांक – 51 – वडगांव बुद्रुक – माणिकबाग (Wadgaon Budruk – Manikbagh)

 

Web Title :- PMC Elections 2022 | the names of 20 prabhag wards were changed in the ward structure announced by pune municipal corporation pmc what are the new names know more

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा