पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Employees-7th pay commission | महापालिकेच्या (Pune Corporation) अधिकारी व कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगातील (PMC Employees-7th pay commission) फरकाची रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. अधिकारी व कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून १ जानेवारी २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या दहा महिन्यांच्या फरकाची रक्कम अदा केली जाणार आहे.
महापालिका अधिकारी व कर्मचार्यांना १ जानेवारी २०२१ पासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू प्रत्यक्षात या वेतनाचा लाभ नोव्हेंबर २०२१ पासूनच्या वेतनातून देण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे १ जानेवारी पासून ३१ ऑक्टोबर दरम्यान सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव वेतनाचा जो फरक राहाणार आहे, ती रक्कम अधिकारी व कर्मचार्यांना देण्यात येणार आहे. (PMC Employees-7th pay commission)
दरम्यान, सध्या आर्थिक वर्ष संपत असताना महापालिकेचे उत्पन्न व प्रत्यक्षात खर्च याचा ताळमेळ घालून
महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी सुमारे १८० कोटी रुपये निधी लागणार आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी
सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी आज परिपत्रक काढले आहे.
त्यानुसार अधिकारी व कर्मचार्यांनी ३१ मार्चला फरकाच्या थकबाकीची बिले ऑडीट विभागाकडून तपासून घेण्याचे आदेश दिले आहेत.
यासाठी सर्व खातेप्रमुखांनी संबधित बिल लेखनिखांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.
तसेच फरकाच्या थकबाकीच्या नोंदी सेवापुस्तकात नोंदविण्यासही सांगितले आहे.
यामुळे या महिन्याच्या वेतनामध्येच महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्यांना फरकाची रक्कम मिळेल, अशी अपेक्षा कर्मचारी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title :- PMC Employees-7th pay commission | Pune Municipal Corporation employees and officers will get the difference of 7th pay commission in the month of March
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update