PMC Encroachment Action | महापालिकेचा आंबेगाव आणि हिंगणे येथील अनधिकृत बांधकामावर बुलडोजर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Encroachment Action | मागील काही दिवसांपासून पुणे महापालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे. पुणे महापालिकेच्या झोन दोन मधील आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) आणि हिंगणे खुर्द (Hingane Khurd) येथील अनधिकृत बांधकामांवर (Unauthorized Constructions) आज कारवाई (PMC Encroachment Action) करण्यात आली. आज करण्यात आलेल्या आंबेगाव बु. येथील कारवाईत सुमारे 34 हजार 790 चौरस फुटाचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. तर हिंगणे खुर्द येथील 4 हजार चौरस फुटाचे क्षेत्र मोकळे करण्यात आले.

 

पुणे महापालिकेने आंबेगाव बु. येथे अतिक्रमण कारवाई (PMC Encroachment Action) करण्यापूर्वी संबंधितांना कलम 52 (1) व 53 (1)(अ) नुसार नोटीस (Notice) देण्यात आली होती. नोटीस देऊन देखील ज्यांनी अनधिकृत बांधकाम काढले नाही अशांवर अतिक्रण विरोधी पथकाने कारवाई केली. तर हिंगणे बुद्रुक येथील अनधिकृत बांधकाम धारकांना 260(1) नुसार नोटीस देण्यात आली होती.

 

आंबेगाव बुद्रुक येथील स.नं. 39 मधील अनधिकृत बांधकांमावर करावाई करुन 1300 चौरस फुटाचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. तर स.नं. 55 मधील 11,200, स.नं 56 मधील 11,730, स.नं. 57 मधील 9,400, स.नं. 101 मधील 1500 चौरस फुटाचे क्षेत्र मोकळे करण्यात आले. या कारवाईसाठी बिगारी सेवक, 4 जेसीबी, 3 ब्रेकर, 4 गॅस कटर तसेच पोलीस कर्मचारी यांची मदत घेण्यात आली.

 

Web Title :- PMC Encroachment Action | Municipal Corporation bulldozers on unauthorized constructions at Ambegaon and Hingane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा