PMC Encroachment Department | काही अटीशर्तींवर सारसबाग, तुळशीबाग आणि बिबवेवाडी येथील स्टॉलधारकांना व्यवसाय करण्याची परवानगी !

सारसबाग चौपाटीवर महापालिका उभारणार ‘वॉकींग प्लाझा’ - विक्रम कुमार, महापालिका आयुक्त व प्रशासक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Encroachment Department | महापालिकेच्यावतीने सारसबाग चौपाटी (Sarasbaug Chowpatty) येथे वॉकींग प्लाझा (Walking Plaza) विकसित करण्यात येणार असून येथील खाद्यपदार्थांच्या स्टॉलधारकांना (Stall Owner) अटीशर्तींवर व्यवसायासास परवानगी देण्यात येणार आहे. तसेच तुळशीबागेतील (TulshiBaug) पथारी व्यावसायीकांकडून थकबाकी लवकरात लवकर भरण्याचे हमीपत्र घेउन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असुन बिबवेवाडी (Bibvewadi) येथील सील केलेले बांधीव गाळे (Shops) नियमान्वीत करण्याचा विचार असून गाळे धारकांना थकबाकी भरल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आज घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली. (PMC Encroachment Department)

 

महापालिकेच्यावतीने मागील काही दिवसांपासून पथारी व्यावसायीक, स्टॉल धारकांकडून थकबाकी वसुलीसाठी तसेच अतिक्रमण केल्या विरोधात व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने सारसबाग चौपाटीवरील खाद्य पदार्थांचे सर्व स्टॉल सील करण्यात आले (Pune PMC Action On Sarasbaug Chowpatty) असून या स्टॉल्सच्या समोर रस्त्यावरच उभारण्यात आलेले शेडस्, टेबल, खुर्च्या जप्त करण्यात आल्या आहेत. याठिकाणी व्यावसायीकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याने प्रशासनाने ही कारवाई केल्यानंतर मागील दोन आठवड्यांपासून येथील सर्व व्यवसाय बंद आहेत. (PMC Encroachment Department)

या पाठोपाठ मागील आठवड्यात तुळशीबागेतील परवानाशुल्काची थकबाकी असलेल्या दोनशेहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांचे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. तर नुकतेच तीन दिवसांपुर्वी बिबवेवाडी गावांमध्ये स्वामी विवेकानंद रस्त्यावरील स्टॉल्सचे बेकायदेशीर रित्या गाळ्यांमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी येथील ५१ गाळे सील करण्यात आले आहेत. हे गाळे बांधल्यानंतर महापालिकेने चार वर्षांपासून त्यांचे भाडेच जमा करणे बंद ठेवले होते.

 

दरम्यान, या सर्व व्यावसायीकांचे हातावर पोट आहे. कोरोनामुळे दोन वर्षे व्यवसाय बंद असल्याने थकबाकी राहील्याचेही पथारी व्यावसायीक संघटना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेउन निदर्शनास आणून दिले होते. यावर आज आयुक्तांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये सारसबाग चौपाटी येथे अतिक्रमण होउ नये तसेच पर्यटकांसाठी वॉकींग प्लाझा करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील व्यावसायीकांनी टेबल, खुर्च्या मांडु नयेत तसेच शेडस् उभारू नयेत, तसेच नियमांचे उल्लंघन करू नये या अटींवरच व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबधित व्यावसायीकाचा परवाना रद्द करण्याचेही यावेळी निश्‍चित करण्यात आले.

बिबवेवाडी येथील स्टॉल्सचे गाळ्यांमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी झालेल्या चौकशी अहवालावर देखिल यावेळी चर्चा झाली.
हे गाळे नियमान्वीत करता येतील याबाबत प्रशासन माहिती घेईल.
नियमान्वीत करता येउ शकणारे गाळे निश्‍चितपणे नियमान्वीत करण्यात येतील, बेकायेदशीर ठरणार्‍या गाळ्यांवर कारवाई करायची.
तोपर्यंत थकबाकी भरून घेउन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती
महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिली.

 

Web Title :- PMC Encroachment Department | Stall holders in Sarasbaug Chowpatty, Tulshibaug and Bibwewadi are allowed to do business on certain conditions! -PMC Commissioner and Administrator Vikram Kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Old Pune-Mumbai Road | खडकी कॅन्टोंन्मेंटच्या हद्दीतील जुन्या पुणे- मुंबई रस्त्याचे काम तातडीने सुरू होणार ! रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू

 

Avinash Bhosale | पुण्यातील सुप्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

 

Pune PMC Tax | सर्वसाधारण सभेने दिलेली ‘सवलतीची’ उपसूचना फेटाळून ! प्रशासनाच्या प्रस्तावाप्रमाणेच समाविष्ट 23 गावांत करआकारणीचा महापालिकेचा निर्णय