PMC Health Department | पुणे महापालिकेच्या आरोग्य सुविधा व योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्यात नगरसेवकांचाही महत्वाचा वाटा – सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Health Department | पुण्यातील सर्वसामान्य (Pune) नागरिकांपर्यंत महापालिकेच्या (Pune Corporation) आरोग्य योजना आणि सुविधा (PMC health Plans And Facilities) पोहोचवण्यात नगरसेवकांचा वाटा मोठा राहीला आहे. यामुळेच वाढत्या लोकसंख्येसोबतच महापालिकेची आरोग्य सुविधा सुधारण्यास आणि अधिक बळकट करण्यात प्रशासनाला यश आले. या सर्व प्रवासाची साक्षीदार आणि एक घटक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचे समाधान असल्याचेे मत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे (Dr. Anjali Sabne) यांनी व्यक्त केले. (PMC Health Department)

 

डॉ. अंजली साबणे आज महापालिकेतील ३४ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाल्या. मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या लाटेमध्ये झोकून देउन काम करणार्‍या डॉ. साबणे या १९८८ मध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून महापालिका सेवेत दाखल झाल्या. सुरवातीला भवानी पेठेतील सोनवणे हॉस्पीटलमध्ये काम केल्यानंतर महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सेवा करत सहाय्यक आरोग्य प्रमुख पदावरून त्या सेवानिवृत्त झाल्या. (PMC Health Department)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

सेवेतील या प्रवासातील अनुभवाबद्दल बोलताना डॉ. साबणे म्हणाल्या, की शहराचा विस्तार होत असताना महापालिकेची आरोग्य सेवाही बळकट होत आहे. शहराच्या विविध भागात महापालिकेने हॉस्पीटल्स उभारली आहेत. यासोबतच सातत्याने आरोग्य विभागातील डॉक्टर व सेवकांची संख्याही वाढत आहे. महापालिकेच्या प्रसुतीगृहांची संख्याही वाढली आहे. याठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपचार मिळत आहेत.

 

राज्य शासनाच्या धोरणानुसार रस्त्यावरील बेघरांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यातही महापालिकेने चांगले काम केले आहे.
शहरी गरीब योजनेच्या माध्यमांतुनही अनेक नागरिकांना चांगले उपचार आणि औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
कमला नेहरू रुग्णालयामध्ये सीएसआरच्या माध्यमातून एनआयसीयू युनिट तसेच सोनावणे हॉस्पीटलमध्येही हे युनिट सुरू
करण्याच्या आव्हानात्मक प्रयत्नामध्ये मला यश आले. महापालिकेचे वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू झाले आहे.
मागील तीन चार वर्षांत हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रशासन आणि राजकिय स्तरावरही एकत्रित प्रयत्न झाले.
या टीमची एक सदस्य म्हणून सहभागी होता आले. निवृत्तीपुर्वी प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू व्हावे, अशी माझी इच्छा होती ती पुर्ण झाल्याचे समाधान वाटते.

महापालिकेच्या आरोग्य योजना व सुविधा सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचविण्यात नगरसेवकांचा महत्वाचा वाटा आहे.
रुग्णांना या सुविधा मिळाव्यात यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करतात तसेच नवीन योजनांसाठी प्रयत्नशील राहातात
यामुळे आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी त्याचा चांगलाच उपयोग होत असल्याचेही डॉ. साबणे यांनी नमूद केले.

 

Web Title :- PMC Health Department | Corporators also play an important role in bringing health facilities and schemes of Pune Municipal Corporation to the general public. Anjali Sabne

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jacqueline Fernandez Killer Look | जॅकलिनने शॉर्ट बस्टियर ड्रेस घालून दिल्या मिलियन डॉलर पोज

 

ST Workers Strike | मोठा निर्णय ! ST पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी एसटी महामंडळात मेगाभरती

 

Aurangabad News | PhD साठी विद्यार्थ्यांकडून मागितली 25 हजाराची लाच; विभागप्रमुख डॉ. उज्वला भडंगे तडकाफडकी निलंबित