पुणे – PMC Health Department | शहरात ऐन पावसाळ्यात डेंग्यू (Dengue) आणि चिकुनगुनिया (Chikungunya) या डासांपासून होणार्या आजारांनी थैमान घातले असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने अद्याप डासोत्पत्ती केंद्र शोधून नष्ट करणे आणि औषध फवारणीच्या कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळच घेतले नसल्याचे समोर आले आहे. मागील दोन वर्षांपासून या कामासाठीची निविदा तांत्रिक कारण देत अडकवून ठेवण्यात आल्याने महापालिकेला (Pune Municipal Corporation – PMC) पुणेकरांचे काही देणे घेणेच नसल्याचे यातून दिसून येत आहे.
जुलै आणि ऑगस्टमध्ये यंदा धुव्वांधार पाउस झाला आहे. सलग पडणार्या पावसामध्ये दोन आठवडे सुर्यदर्शनही दुर्लभ झाले होते. ही परिस्थिती डासोत्पत्तीला पूरक ठरल्याने डासांपासून होणार्या डेंग्यू, झिका या आजारांसोबतच चिुकनगुनियाचेही रुग्ण मोठ्या संख्येने वाढले. विशेष असे शहरात यंदा प्रथमच झिकाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले असून डेंग्यूच्या रुग्णांनीही केव्हांच शंभरी पार केली आहे. डेंग्यूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना महापालिकेच्या घोले रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहामध्ये घडली. या वस्तीगृहात तब्बल ३१ विद्यार्थी डेंग्यू पॉझीटीव्ह झाल्याचे आढळून आले असून अद्यापही काहीजणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, डेंग्यू अथवा झिकाचा (Zika Virus) रुग्ण आढळल्यानंतर रुग्ण राहात असलेल्या परिसरात डासोत्पती केंद्र नष्ट करण्यासाठी महापालिकेच्यावतीने शोध मोहीम हाती घेण्यात येते. ही केंद्र नष्ट करणे आणि औषध फवारणी केली जाते.
तब्बल पाचशे चौ.कि.मी.पेक्षा अधिकचे क्षेत्र असलेल्या महापालिकेकडे या कामाासठी जेमतेम २२५ कर्मचारी आहेत. साप्ताहीक सुट्टया आणि अन्य कारणांमुळे यापैकी साधारण दीडशे ते दोनशे कर्मचारी ऑनफिल्ड उपलब्ध होतात. किटकांपासून होणार्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका इनडोअर वेक्टर कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत दरवर्षी १५० कर्मचारी ठेकेदारी पद्धतीने नियुक्त करते. प्रामुख्याने पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये पोषक वातावरणामुळे डासोत्पती होत असताना या कर्मचार्यांची चांगली मदत होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून आरोग्य विभागाने यासाठी निविदा प्रक्रिया राबविली मात्र तांत्रिक कारण देत निविदा मंजुरच केल्या नाहीत.
सुदैवाने मागील दोन वर्षात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तितकासा परिणाम जाणवला नाही.
मात्र, यंत्रा पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी अद्याप आहे
त्या मनुष्यबळावरच महापालिका काम करून पुणेकरांचे आयुष्य पणाला लावत असल्याचे समोर आले आहे.
यासंदर्भात आरोग्य विभागाच्या किटक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ. सुर्यकांत देवकर (Dr Suryakant Devkar)
यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, इनडोअर वेक्टर कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत निविदा प्रक्रिया राबविली
असून अंतिम मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा