PMC Jumbo Covid Hospital | ‘कोरोना’ संसर्गाची दोन वर्षे पुर्ण ! जंबो आणि बाणेर कोव्हिड हॉस्पीटल बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Jumbo Covid Hospital | कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेच्यावेळी ’मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढल्याने ऑगस्ट 2020 ’मध्ये सीओईपीच्या ’मैदानावर सुरू करण्यात आलेल्या जंबो कोव्हिड हॉस्पीटलची (PMC Jumbo Covid Hospital) आवराआवर सुरू झाली आहे. बाणेर (Baner) येथे सुरू करण्यात आलेले कोव्हिड स्पेशल हॉस्पीटलही (Covid Special Hospital) आजपासून बंद करण्यात आले आहे. यासोबतच लसीकरण (Vaccination) आणि प्रामुख्याने स्वॅब टेस्टिंग साठी (Swab Testing) शाळा व सार्वजनिक सभागृहांच्या आवारात उभारण्यात आलेले मंडपही काढून टाकण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी दिली.

पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याच्या घटनेला उद्या (दि.9) दोन वर्षे पुर्ण होत आहेत. या दोन वर्षामध्ये हाहाकार ’माजविणार्‍या कोरानाची तिसरी लाटही (Third Wave)संपुष्टात आली आहे. चाळीस लाख लोकसंख्येच्या पुणे शहरात (Pune City) झपाट्याने रुग्णसंख्या वाढत गेल्याने पहिल्या लाटेपासूनच शहर संपूर्ण देशामध्ये रेड झोनमध्ये होते. पहिल्या लाटेच्यावेळी आरोग्य यंत्रणा तोकडी पडल्याने खाजगी रुग्णालयांची मदत तर घेतलीच होती परंतू राज्य शासन (State Government) आणि ’महापालिकेच्यावतीने शिवाजीनगर येथील सीओईपी च्या ’मैदानावर 800 ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटर बेडचे (Ventilator Bed) तात्पुरते जंबो हॉस्पीटल (PMC Jumbo Covid Hospital) उभारण्यात आले होते.

या जंबो हॉस्पीटलचा प्रवासही पहिल्या पंधरवड्यात तितकासा सुकर राहीला नाही. परंतु उपचार व व्यवस्थापनासाठी पहिल्यांदा नेमलेल्या लाईमलाईट या संस्थेला तत्काळ बाहेरचा रस्ता दाखवून नवीन संस्था नेमण्यात आली. पहिल्या पेक्षा ’मागीलवर्षी ’फेब्रुवारी’मध्ये आलेल्या दुसर्‍या लाटेमध्ये या जंबो हॉस्पीटलचा चांगला उपयोग झाला. याच दरम्यान महापालिकेने आर सेव्हन अंतर्गत ताब्यात आलेल्या बाणेर येथील तयार इमारतीमध्ये सीएसआरच्या (CSR) माध्यमातून अल्पावधीत 350 बेडचे कोव्हिड हॉस्पिटल विक्रमी वेळेत उभारले. तसेच महापालिकेच्या दळवी, लायगुडे, नायडू या रुग्णालयांतील बेडची क्षमताही वाढविण्यासाठी ई.एस.आय. गणेश कलामंच येथेही तात्पुरती उपचार सुविधा निर्माण केली होती.

 

दुसर्‍या लाटेमध्ये जंबो हॉस्पीटलच नव्हे तर राज्यातील देशातील विविध भागातील रुग्णालयांपुढे ऑक्सिजन (Oxygen) व रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या (Remdesivir Injection)पुरवठ्याचे संकट निर्माण झाले होते.
या पार्श्‍वभूमिवर नायडूसह अन्य रुग्णालयांतही स्वत:चे ऑक्सीजन प्लांट (Oxygen Plant) उभारण्यात आले. उद्योगांसाठी लागणारा ऑक्सीजन उपचारासाठी वळविण्यात आला.
प्रसंगी रेल्वेनेही बल्लारी येथून मागवण्यात आला.
तसेच ऑक्सीजनची गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा पंधरा दिवसांत कमी झाला.

साधारण मागीलवर्षी जूनमध्ये दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर 22 जूनपासून जंबो हॉस्पीटल बंद करण्यात आले.
मात्र, तिसर्‍या लाटेच्या शक्यतेमुळे जंबो हॉस्पीटल तसेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी जानेवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली.
तिसर्‍या लाटेमध्ये संसर्गाचा दर हा पहिल्या दोन लाटांपेक्षा अधिक राहीला. मात्र, जानेवारीपासून सुरू झालेली लसीकरण मोहीम आणि बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने अनेकांवर घरीच उपचार झाले. नायडू, बाणेर, दळवी आणि लायगुडे रुग्णालयासोबत खाजगी रुग्णालयातही बरेच बेडस् रिक्त राहत असल्याने सर्व तयारीनिशी सुसज्य असलेल्या जंबो हॉस्पीटलमध्ये रुग्ण दाखल केले गेले नाही.
दोन ते तीन आठवड्यांपुर्वीपासून तिसरी लाटही ओसरू लागल्याने जंबो हॉस्पीटल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याठिकाणी असलेले बेडस् व अन्य उपचार साहित्यांची नोंदणी करून ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हे साहित्य अन्य रुग्णालयांत गरजेनुसार दिले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिली.

Web Title :-PMC Jumbo Covid Hospital | Two years of ‘corona’ infection completed!
Jumbo and Baner Covid Hospital closed

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा