PMC Lok Adalat | पुणे महापालिकेतील लोक अदालतीमध्ये 1369 केसेस निकाली; ‘इतक्या’ लाखाची थकित रक्कम वसुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे महापालिकेमध्ये (Pune Corporation) शनिवारी झालेल्या लोक अदालतीमध्ये (PMC Lok Adalat) न्यायालयात दाखल होउ शकणार्‍या १ हजार ३६९ केसेसमध्ये तडजोड करण्यात आली आहे. प्रामुख्याने मालमत्ता व्यवस्थापन विभाग आणि पाणी पुरवठा विभागाच्या या केसेसमधून महापालिकेचे ७४ लाख ५५ हजार ४६ रुपये थकित येणे वसुल झाले आहे. दरम्यान, स्थायी समितीने लोक अदालतीमध्ये मिळकतकर विभागाच्या ५०० केसेस दाखल करण्यासंदर्भातील निर्णयावर सर्वसाधारण सभेत आक्षेप घेण्यात आल्याने आज त्या केसेस लोक अदालतीमध्ये (PMC Lok Adalat) घेण्यात आल्या नाहीत.

महापालिकेमध्ये आज लोक अदालतीचे (PMC Lok Adalat) आयोजन करण्यात आले होते.
या लोक अदालतीमध्ये महापालिकेच्या विविध विभागाकडील कायदेशीर अडचणींमुळे न्यायालयीन स्तरावर जावू शकणारी थकबाकीची प्रकरणे ठेवण्यात आली होती.
यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता विभाग आणि पाणी पट्टी विभागाच्या केसेस अधिक होत्या.
महापालिकेने तडजोडीसाठी संबधितांना नोटीसेस पाठवून लोक अदालतीमध्ये उपस्थित राहाण्याचे आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला.
लोक अदालतीमध्ये सहभागी झालेल्या पुणेकरांच्या तब्बल १ हजार ३६९ केसेस तडजोडीणे सोडविण्यात आल्या.
यातून महापालिके ची ७४ लाख ५५ हजार ४६ रुपयांची येणी वसुल झाली.
महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी ऍड. निशा चव्हाण (Adv. Nisha Chavan) व महापालिकेच्या पॅनेलवरील वकिलांनी लोक अदालतीच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
विशेष असे की महापालिकेच्या पॅनेलवर वर्षभर मुदतवाढ मिळाली नसतानाही पॅनेलवरील वकिलांनी कुठल्याही मानधनाशिवाय लोक अदालतीमध्ये महापालिकेचे प्रतिनिधीत्व केले.

 

त्यामुळे ‘मिळकत कराची’ प्रकरणे लोक अदालतीपुढे ठेवली नाहीत

मिळकत कर विभागाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे.
तांत्रिक अडचणींमुळे न्यायालयात जाउ शकणारी सुमारे ५०० प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
किंबहुना स्थायी समितीनेही याला मान्यता दिली होती.
या प्रकरणातून महापालिकेला १५ ते २० कोटी महसुल मिळेल अशी अपेक्षा होती.
परंतू स्थायी समितीने मंजूर केलेल्या या प्रस्तावावर तीनच दिवसांपुर्वी सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी व विरोधक अशी जोरदार खडाजंगी झाली.
यामुळे प्रशासनाने आज झालेल्या लोक अदालतीमध्ये ही प्रकरणे ठेवली नाहीत, अशी माहिती महापालिकेतील अधिकार्‍यांनी दिली.

 

Web Title : PMC Lok Adalat | 1369 cases settled in Pune Municipal Court; Recovered arrears of ‘so much’ lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rohit Pawar | हे योग्य नाही… रोहित पवारांचे आपल्याच सरकारला खडे बोल

PMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकेत 91 जागांसाठी मोठी भरती; पगार 1.50 लाख रूपयांपर्यंत

SIM Card Portability | तुमचा मोबाइल नंबर फक्त 1 रुपयांत घरबसल्या पोर्ट करता येणार; जाणून घ्या नवा नियम

Girlfriend On Rent | इथं भाड्याने मिळतात ‘गर्लफ्रेन्ड’, तुम्ही सुद्धा करू शकता ‘हायर’ !