PMC Medical College | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टचे कामकाज ‘अध्यक्षा’ शिवाय सुरू राहाण्यात अडचणी निर्माण होणार नाहीत

‘पदसिद्ध’ नगरसेवक ट्रस्टींची मुदत 14 मार्चला संपत असल्याने निर्माण झालेला पेच सुटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Medical College | नगरसेवकांची मुदत १४ मार्चला संपणार असल्याने महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Pune) ट्रस्टवरील ‘पदसिद्ध’ नगरसेवकांचे संचालकपदही संपुष्टात येणार आहे. परंतू आवश्यक खरेदीसह पत्रव्यवहार करण्याचे अधिकार हे महाविद्यालयाच्या डीन यांना देण्यात आल्याने फारशा अडचणी जाणवणार नाहीत. परंतू जोपर्यंत नगरसेवकांच्या माध्यमांतून नवीन ट्रस्टींची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत ट्रस्टचे संचलन अधिकार्‍यांमार्फतच होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (PMC Medical College)

 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टची बैठक ट्रस्टचे अध्यक्ष महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्या उपस्थितीत बुधवारी झाली. या बैठकीमध्ये महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता मिळाल्यानंतर उर्वरीत तांत्रिक सोपस्कार पार पाडण्यासोबतच विद्यार्थ्यांना फी किती आकारावी याबाबत प्राथमिक चर्चा झाली. ट्रस्टच्या माध्यमातून हे महाविद्यालय चालवायचे असल्याने व्यवस्थापन खर्चाचा आढावा घेउनच फी आकारल्यास कमीत कमी आर्थिक भार महापालिकेवर राहील, यादृष्टीनेही विचार विमर्श करण्यात आला. येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेउन फी आकारणी, प्राध्यापक व अन्य स्टाफ नियुक्तीचा मुद्दा अंतिम करण्यात येईल, असे बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांनी सांगितले. (PMC Medical College)

दरम्यान महाविद्यालय सुरू होत असतानाच ट्रस्टवरील पदसिद्ध नगरसेवकांचे संचालकपदही संपुष्टात येत असल्याने ट्रस्टचा कारभार कसा होणार याबाबतही प्राथमिक चर्चा झाली. या ट्रस्टवर महापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते व सर्व पक्षीय गटनेत्यांचा समावेश आहे. १४ मार्चला नगरसेवकपद संपुष्टात येत असल्याने आपोआप संचालकपदही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या ट्रस्टच्या निर्णयांवरही त्याचा परिणाम होणार आहे. १४ मार्चनंतर महापौर अर्थात अध्यक्षांविना पार पडणार्‍या ट्रस्टचा बैठका कोरम अभावी तहकूब करून काही वेळानेच अधिकार्‍यांपैकी एकाच्या अध्यक्षतेखाली तहकूब बैठक घेता येणार असल्याने कामकाजात फारशा अडचणी येणार असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

 

Web Title :- PMC Medical College | Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Trust News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mayor Muralidhar Mohol | नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून खुला, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

 

Pune Swachh Survekshan 2022 | ‘पुणे स्वच्छ सर्वेक्षण 2022’ अंतर्गत नागरिकांच्या सहभागातून शहर पातळीवर भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन

 

New Labour Code | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 1 एप्रिलपासून मिळणार 300 सुट्ट्या..! मोदी सरकार नवीन नियम लागू करण्याची शक्यता