PMC Medical College Pune | …म्हणून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय PPP तत्वावर चालविण्याचा प्रस्ताव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Medical College Pune | पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Pune) विद्यार्थी प्रवेशासाठी ७ लाख रुपये फी निश्‍चित करण्यात आली आहे. परंतू फी मधून मिळणारे उत्पन्न आणि महाविद्यालय व रुग्णालय चालविण्यासाठी येणारा खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याने हे महाविद्यालय पीपीपी Purchasing Power Parity (PPP) तत्वावर चालवावे, असा प्रस्ताव वैद्यकीय महाविद्यालय ट्रस्टच्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी दिली. (PMC Medical College Pune)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयाला सर्व परवानग्या मिळाल्या असुन यावर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश फी किती असावी, महाविद्यालय व रुग्णालय (PMC Hospital) व्यवस्थापनासाठी येणारा खर्च यावर सोमवारी महाविद्यालयासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टींची महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची व चर्चेची माहिती देताना अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी सांगितले, की या बैठकीमध्ये शासनाच्या निर्देशानुसार ७ लाख रुपये फि आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या वर्षी फिच्या माध्यमातून ७ कोटी रुपये उत्पन्न मिळेल.

तर दरवर्षी पुढील वर्ग सुरू होउन पाचव्या वर्षीपर्यंत ५०० विद्यार्थी होतील. पाचव्या वर्षीपासून ३५ कोटी रुपये फि मिळेल. मात्र, महाविद्यालय व्यवस्थापनासाठी दरवर्षी ६० कोटी रुपये खर्च तसेच महाविद्यालयाची इमारत उभारण्यासाठी ६५० कोटी रुपये खर्च येणार आहे. यामुळे सुरवातीचे काहीवर्षे महापालिकेलाच दरवर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करावी लागणार आहे. महापालिकेच्यावतीने अगोदरच मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आली असून समाविष्ट गावांमधील विकासकामांचा अनुशेषही भरून काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज भासणार आहे, यावरही बैठकीमध्ये चर्चा झाली. (PMC Medical College Pune)

 

हा सर्व लेखाजोखा मांडल्यानंतर महापालिका आयुक्तांनी महापालिकेवरील आर्थिक दायित्व कमी करण्यासाठी महाविद्यालय पीपीपी तत्वावर चालविण्यास देता येईल,
असा प्रस्ताव बैठकीमध्ये मांडला. बहुतांश ट्रस्टींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
परंतू ट्रस्टच्या माध्यमातून चालविण्यात येणारी वैद्यकीय महाविद्यालये पीपीपी तत्वावर चालविता येतील का,
हे मॉडेल कसे राबवता येईल याबात सर्व माहिती घेउनच अंतिम निर्णय घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे बिनवडे यांनी नमूद केले.

 

Advt.

Web Title :- PMC Medical College Pune | … hence the proposal to run Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College on Purchasing Power Parity (PPP) basis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramdas Athawale | ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; मोदींच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्याची मागणी ! राज्याच्या राजकारणात येणार मोठा ट्विस्ट?

 

Eknath Khadse | एक नोटीस आली काय अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, एकनाथ खडसेंचा फडणवीसांना सवाल

 

Pune Crime | अंगठी खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या आंबेगाव पठार परिसरातील 20 आणि 21 वर्षीय मुलींना सहकारनगर पोलिसांकडून अटक

 

Pune Corporation | प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांचा पहिलाच दणका ! वाहतूक गतिमान करण्यासाठी पदपथ, रस्ते आणि इमारतींच्या साईड मार्जीनमधील बेकायदा व्यवसायांवर कारवाई करणार