PMC Notice To Bajaj Allianz House | अनधिकृत बांधकाम प्रकरणी बजाज अलियान्झ हाऊसला पुणे महापालिकेची नोटीस

… तर बजाज अलियान्झ हाऊसचा पाचवा आणि सहाव्या मजल्याचे अनिधकृत बांधकाम महापालिकेकडून पाडण्यात येईल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Notice To Bajaj Allianz House | पुण्यातील विमानतळ रोडवरील (Airport Road Pune) बजाज अलियान्झ हाऊसला अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) बांधकाम विकास विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग क्र.4 चे पदनिर्देशित अधिकारी तथा उप अभियंता योगेंद्र सोनवणे यांनी ही नोटीस बजावली आहे. तसेच 15 दिवसात म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

एअरपोर्ट रोड वरील व्हाईट हाऊस सोसायटी येरवडा येथे बजाज अलियान्झ हाऊसचा पाचवा आणि सहाव्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. 300 चौरस क्षेत्रफळ असलेले हे बांधकाम करताना पूर्व परवानगी न घेता करण्यात आले आहे.
बांधकाम करताना कोणतीही परवानगी न घेता नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटीसी मध्ये संबंधितांना 15 दिवसात लेखी खुलासा करण्यास सांगण्यात आला आहे. मुदतीमध्ये लेखी खुलासा केला नाही
तर अनिधकृत बांधकाम महापालिकेकडून पाडण्यात येईल. तसेच यासाठी येणारा खर्च संबंधिताकंडून वसुल केला जाईल,
असे महापालिकेने दिलेल्या नोटीसीमध्ये नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Kalyani Nagar Pune Accident | ‘कुणालाही पाठीशी घालू नका’ पुणे हिट अँड रन प्रकरणात CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश

Pune CP Amitesh Kumar On Kalyani Nagar Accident | व्हायरल व्हिडिओवर पोलीस आयुक्त म्हणाले, आरोपीने ऑनलाईन पेमेंट केले यातून मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट, पण… (Video)

Kalyani Nagar Pune Accident | पुणे हिट अँड रन प्रकरण : अपघात प्रकरणाचा आणखी एक व्हिडीओ आला समोर, काय आहे व्हिडीओत? (Video)

Shrirang Barne On Ajit Pawar NCP | श्रीरंग बारणेंची नाराजी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, माझे काम केले नाही, अजितदादांना यादी… (Video)