PMC On Metro Route Pune | मेट्रो मार्गिकेमुळे पावसाळ्यात रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप ! मेट्रोसोबत समन्वयाने तातडीने उपाययोजना करणार – महापालिका आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC On Metro Route Pune | मेट्रो प्रकल्पाच्या सदोष कामामुळे शहरातील काही भागामध्ये पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साठून राहाते. यासंदर्भात मंगळवारी मेट्रोच्या अधिकार्‍यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली असून ज्याठिकाणी मेट्रो प्रकल्पामुळे (Pune Metro Project) रस्त्यावर पाणी साठते तेथे पाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीने कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (PMC On Metro Route Pune)

 

शहरात मागील काही वर्षांपासून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. जंगली महाराज रस्त्यावर (JM Road Pune) मागील दोन तीन वर्षात मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठत आहे. मेट्रोच्या कामामुळे जंगली महाराज रस्त्यावरून नदीपात्रात पाणी वाहून नेणार्‍या वाहीन्यांना अडथळा आल्याचे निदर्शनास आले असून येथे काही प्रमाणात दुरूस्तीचे काम करण्यात आले असून लवकरच नवीन दोन वाहीन्या देखिल विकसित करण्यात येणार आहे. तसेच कर्वे रस्त्यावर वनाज आणि एसएनडीटी परिसरातही मेट्रो पुलाखाली डिव्हाडर टाकल्याने रस्त्यावरून नैसर्गिकरित्या पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. मागीलवर्षीपासून ही समस्या भेडसावत असली तरी त्यावर मेट्रो प्रशासनाने कुठलीच उपाययोजना केलेली नाही, त्यामुळे यंदाच्या अवकाळीत सलग दोनवेळा येथील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. (PMC On Metro Route Pune)

यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC) यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, मंगळवारी महामेट्रो कंपनीसोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी संबधित स्पॉटवर मेट्रो प्रशासनाने तातडीने कामे हाती घ्यावीत. मेट्रोला लगेचच शक्य नसेल तर महापालिकेच्या माध्यमातून ही कामे करून मेट्रो कडून कामाचा खर्च घेण्यात येईल.

 

माण- म्हाळुंगे ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील (Man- Mhalunge to Shivajinagar Metro route)
गणेशखिंड रस्त्याचे (Ganesh Khind Road) रुंदीकरण करण्यात येणार आहे.
यासाठी ९ मिळकतींची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच काम सुरू होईल.
या जागा ताब्यात घेउन रस्ता रुंदीकरण केले जाईल.
हा रस्ता रुंद केल्याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून (Pune University Chowk) उभारण्यात
येणार्‍या दुमजली उड्डाणपुलाच्या रॅम्पसाठी तसेच रस्त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे, असेही विक्रम कुमार यांनी नमूद केले.

 

Web Title :- PMC On Metro Route Pune | Due to the metro route, the roads are flooded during the rainy season! Immediate measures will be taken in coordination with Metro – Municipal Commissioner Vikram Kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political News | अजितदादा भाजपसोबत जाणार? राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले – ‘परिस्थितीनुसार निर्णय…’

Bombay High Court | मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला दणका तर शिंदे सरकारला दिलासा; BMC मध्ये 227 वॉर्ड राहणार

Black-Yellow Taxis Fares Hike In Pune | पुणे जिल्ह्यातील काळ्या- पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ, जाणून घ्या सविस्तर