PMC On Pune Rain | रेकॉर्डब्रेक पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाण्याचे लोट; आवश्यक तेथे मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन टाकण्यात येणार – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC On Pune Rain | हवामान खात्याकडून (IMD) नोंदी करण्यास सुरूवात झाल्यानंतर शहरात दोन तासांत तब्बल १०५ मि.मी. पाउस पडण्याचा विक्रम सोमवारी (दि.१७) स्थापित झाला. अवघ्या दोन तासांत पडलेल्या या पावसामुळे कोंढवा, बिबवेवाडी (Bibvewadi), वानवडी (Wanwadi), विमाननगर (Viman Nagar), वडगाव शेरी (Wadgaon Sheri), भवानी पेठ (Bhavani Peth), नाना पेठेत (Nana Peth) घरामध्ये पाणी शिरले तर सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहने वाहून जातील एवढे होते. कोंढवा खुर्द (Kondhwa Khurd) येथील भाजी मंडई (Mandai Pune) आणि मंगळवार पेठेतील (Mangalwar Peth) सदानंदनगरमध्ये (Sadanand Naga) अडकलेल्या १२ नागरिकांची अग्निशामक दलाने (Fire Brigade) सुखरूप सुटका केली. (PMC On Pune Rain)

 

सुदैवाने शहरामध्ये कुठलिही जिवीतहानी झाली नाही. अग्निशामक दल आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांनी (PMC Officers) पावसातच तातडीने उपाययोजना केल्याने पाण्याचा वेळेत निचरा होउ शकला. परंतू या पावसामुळे शहरातील सखल भागातील पावसाळी लाईन्स बदलणे, कचर्‍याचे योग्य नियोजन आणि पाण्याला अडथळे ठरणार्‍या अडचणींवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची कामे तातडीने हाती घेण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांनी दिली. (PMC On Pune Rain)

 

विक्रम कुमार यांनी सांगितले, की सोमवारी सकाळी हवामान खात्याने ५० ते ६० मि.मी. पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. रात्री ९ वाजता पाउस वाढण्याची शक्यता वर्तविली. परंतू यानंतर पुढील दोन तासांत औंध व बाणेर परिसर वगळता संपुर्ण शहरात सरासरी १०५ मि.मी. पाउस झाला. ५० ते ६० मि.मी. पाउस झाल्यानंतर पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या वाहन्या शहरात आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने व ठिकठिकाणी कचरा, झाडाच्या फांद्यांच्या कचर्‍यामुळे पाणी वाहून नेण्यात अडचणी आल्याने रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते. (PMC On Pune Rain)

मी स्वत: शहरातील भवानी पेठ व परिसरात ज्या ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले होते, तेथे पाहाणी केली. याठिकाणी गेल्या काही वर्षांत रस्त्यांची उंची वाढल्याने खालील बाजूस गेलेल्या वसाहती आणि इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. कोंढवा, वडगाव शेरी, विमान नगर, भवानी पेठ,, बिबवेवाडी येथे घरांमध्ये पाणी शिरले. जिल्हाधिकारी कार्यलयकडील लोकांनी सर्व्हे सुरू केला असून नुकसानीचे पंचनामे सुरू. गाळ काढणे, बेसमेंट मधील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. उपायुक्त सचिन इथापे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने शहरातील कंट्रोल रुममधून १५ क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशामक दलाशी संपर्कात होते. कंट्रोल रुमकडे सुमारे २५० कॉल्स आले. त्यामध्ये भिंत पडणे, पाणी शिरणे, वाहने अडकून पडणे तसेच सिमाभिंती पडण्याच्या कॉल्सची संख्या अधिक होती. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाकडे जेसीबी, जेटींग मशिनसह साधारण १० कर्मचार्‍यांची स्वतंत्र टीम्स तैनात करण्यात आल्या होत्या.

 

मेट्रोच्या कामामुळे अडचणी
फर्ग्युसन आणि जंगली महाराज रस्त्यावर (JM Road) मेट्रोच्या कामासाठी (Pune Metro) बॅरीकेडींग केल्याने पाण्याचा प्रवाह अडकून रस्ते पाण्याखाली गेले होते. फर्ग्युसन कॉलेज मागील वेताळ टेकडी आणि हनुमान टेकडी परिसरात झालेल्या पावसाचे पाणी वेगाने उताराने वाहत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे.
रात्रीतच या ठिकाणचे बॅरीकेडस हटवून पाण्याला वाट करून देण्यात आली.
फर्ग्युसन रस्त्यावर मोठ्या व्यासाची पावसाळी लाईन टाकण्याची गरज आहे.
तसेच जंगली महाराज रस्त्यावर मागील चार पावसांत पाणी साठण्याच्या घटनांची दखल घेण्यात आली असून
याचा अभ्यास आणि उपाययोजना करण्यासाठी अधिकारी नेमण्यात आला आहे.

रेकॉर्डब्रेक पाउस
शहरात यापुर्वी २०१० मध्ये एका दिवसांत १८० मि.मी. पाउस पडला होता. तर ऑक्टोबर महिन्यांत यापुर्वी ४४० मि.मी. ३१६ मि.मी. पावसाचे सर्वोच्च रेकॉर्ड आहे.
यंदा कालपर्यंत २६४ मि.मी. पाउस झाला आहे. ऑक्टोबर महिन्याचे अद्याप दोन आठवडे बाकी आहेत.
पावसाची नोंद करण्यास १८९२ मध्ये सुरूवात झाली आहे.
तेंव्हापासून केवळ दोन तासांत १०५ मि.मी. पाउस पडण्याची पहिलीच वेळ असून हा आतापर्यंचा रेकॉर्डब्रेक पाउस ठरला आहे.

 

ठळक बाबी

शहरात दोन तासांतील आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक पाउस

पावसाच्या क्षमतेत पावसाळी लाईन्स कमी क्षमतेच्या असल्याने रस्त्यांवर पाणी. मोठ्या व्यासाच्या लाईन्स टाकण्याची गरज.

प्लास्टिक, घरातील वापराच्या वस्तुंच्या कचर्‍यामुळे तसेच संध्याकाळच्या वेळेत व्यवसाय करणार्‍यांच्या कचर्‍यामुळे पावसाळी चेंबर्स तुंबले.

 

Web Title :- PMC On Pune Rain | Record-breaking rains inundate city roads; Larger diameter pipelines will be laid wherever necessary – Vikram Kumar, Municipal Commissioner and Administrator

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना क्रेडिट जाऊ नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद; संदीप देशपांडेंचा आरोप

Uddhav Thackeray | चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Pune Crime | ताडपत्री चोरण्याचा जाब विचारल्याच्या रागातून रॉडने मारहाण, कोंबडी पुलावरील घडना