PMC Online Gunthewari | 10 जानेवारीपासून गुंठेवारीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने केली तयारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Online Gunthewari | पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) १० जानेवारीपासून गुंठेवारीचे (Gunthewari) प्रस्ताव दाखल करून घेतले जाणार आहेत. गुंठेवारीची प्रकरणे ऑनलाईन स्विकारण्यात (PMC Online Gunthewari) येणार असून पुढील कार्यपद्धतीची माहिती आज महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे.

 

राज्य शासनाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०२० पुर्वीची अनधिकृत घरे (Unauthorized Houses) आणि इमारतींचे मालक (Building Owner) १० जानेवारीपासून महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे (PMC Construction Department) ऑनलाईन पद्धतीने आर्किटेक्ट अथवा लायसन्स इंजिनिअर मार्फत प्रस्ताव दाखल करू शकतील. हे प्रस्ताव दाखल केल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील शहर अभियंता कार्यालयाच्या आवक- जावक अर्थात सिंगल विंडोमधून प्रस्ताव तपासून चलन घ्यायचे आहे. चलनाच्या रकमेचा भरणा महापालिकेच्या तळमजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीने केल्यानंतर भरणा केलेले चलन व गुंठेवारीची संपुर्ण फाईल व कागदपत्रे बांधकाम विभागाच्या आवक- जावक विभागाकडे जमा करायची आहेत. (PMC Online Gunthewari)

 

आवक जावक विभागात प्राप्त झालेली गुंठेवारीची प्रकरणांची पेठनिहाय यादी करून ती संबधित झोनमध्ये कार्यरत असलेल्या बांधकाम निरीक्षकांकडे हस्तांतरीत केली जाणार आहेत. बांधकाम विभागाने सातही झोनमधील गुंठेवारीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी बांधकाम निरीक्षक, उपअभीयंता आणि कार्यकारी अभियंता यांची जबाबदारी निश्‍चित केली आहे. यासंदर्भातील लेखी आदेशच आज बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी काढले आहेत.

 

Web Title :- PMC Online Gunthewari | PMC ready to start online gunthewari regularisation process from January 10

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aloe Vera Uses And Side Effects | कोरफडीचा वापर करणाऱ्या महिलांवर होतात ‘हे’ 5 दुष्परिणाम; जाणून घ्या

Multibagger Penny Stock | अवघ्या 1 आठवड्यात पैसे दुप्पट करणारा पेनी स्टॉक, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

Grahak Peth Pune | ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवात बासमती, आंबेमोहोर, दुबराजपासून इंद्रायणी पर्यंत तब्बल 45 प्रकार; अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी म्हणाल्या – ‘गृहिणींकरीता विविध प्रकारचे महोत्सव ही अनोखी पर्वणी’

 

Post Office Internet Banking | पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल नेट बँकिंगची सुविधा, कशी करू शकता अ‍ॅक्टिव्ह? जाणून सविस्तर प्रक्रिया