PMC Parking | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिजित बारवकर यांच्या मागणीला यश ! महापालिका गणेशोत्सवासाठी मंडईतील वाहनतळ उद्यापासून सुरू करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  PMC Parking | गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी मंडईतील सध्या बंद असलेला महापालिकेचा मिसाळ वाहनतळ (PMC Parking) महापालिकेच्यावतीने (Pune Corporation) उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमणार (Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar) यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मध्यवर्ती शहरामध्ये वाहन उभी करण्याची मोठी समस्या आहे. अशातच मंडईतील मिसाळ वाहनतळ (satish misal parking mandai) देखिल बंद आहे. किमान निविदा प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी गणेशोत्सवामध्ये महापालिकेने हे वाहनतळ सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिटणीस अभिजीत बारवकर (Pune NCP Secretary Abhijeet Barwakar) यांनी केली होती. बारवकर यांच्या मागणीची दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले, की गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मिसाळ वाहनतळ सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी महापालिकेच्या कर्मचार्‍यांच्या मार्फत तात्पुरत्या स्वरुपात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. नियमानुसार पार्किंग शुल्कही आकारण्यात येईल. दरम्यान, मंडईतील हुतात्मा बाबू गेनू वाहनतळावर (hutatma babu genu vahantal mandai) नियमापेक्षा अधिकचे पार्किंग शुल्क आकारले जात असल्याबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवरून संबधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार तथ्या आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. खेमणार यांनी स्पष्ट केले.

Web Title :  PMC Parking | Success to NCP’s Abhijit Barwakar’s demand! Municipal Corporation will start parking in Mandai from tomorrow for Ganeshotsav

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Cabinet Decision | मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! चक्रीवादळाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कोकणाला 3 हजार कोटी

Dizo Smartwatch | ‘डीझो’ने भारतात लाँच केल्या 2 बेस्ट स्मार्टवॉच; काय आहे किंमत? जाणून घ्या

OBC Reservation | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार अध्यादेश काढणार