PMC PMAY Scheme Online Lottery | पुणे महापालिकेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1030 रिक्त सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत; यादी जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC PMAY Scheme Online Lottery | पुणे महानगरपालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PMC PM Awas Yojana) एकूण 1030 रिक्त सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत आज (गुरुवारी) महापालिकेत पार पडली. ही सोडत पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade) यांच्या हस्ते काढण्यात आली आहे (PMC PMAY Scheme Online Lottery). यावेळी सदनिकांसाठी एकूण 16 हजार 545 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 1 हजार 30 अर्जांची सोडत काढण्यात आली आहे. यावेळी पुणे महापालिकेच नगर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare ) यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. (PMC allot 1,030 homes under PMAY scheme through online lottery)

 

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या नवीन इमारत येथे सदनिकांसाठीची सोडत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. दरम्यान, सदर सोडतीसाठी 5 ऑगस्ट 2021 ते 4 सप्टेंहर 2021 रोजी दरम्यान नागरीकांकडून मागणी अर्ज मागवण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 16 हजार 545 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 1 हजार 30 अर्जांची सोडत आज काढण्यात आली. उर्वरित नागरिकांना प्रतिक्षा यादीत समाविष्ठ करण्यात आले.

 

अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, ”गरीब लाभार्थ्यांना परवडणा-या दरात घर उपलब्ध करुन दिले आहे.
त्यामुळे शासनाच्या प्राप्त होणा-या अनुदानासह शहरातील नागरीकांचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे.
त्याचबरोबर वित्तीय संस्थांनी लाभार्थ्यांना स्वस्त किमतीत कर्ज उपलब्ध करुन दिल्यास या योजनेला गती मिळेल.”
असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या सोडतीचा निकाल महापालिकेच्या संकेत स्थळावर (https://www.pmc.gov.in/) उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) allot 1,030 homes under PMAY scheme through online lottery; List released

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Unlock | ‘महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून कोरोनावरील निर्बंध हटणार पण…’ – आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

 

Domestic LPG Gas Prices | 1 एप्रिलपासून पुन्हा वाढू शकतात LPG सिलेंडरचे दर, जाणून घ्या किती रुपयांची होऊ शकते वाढ

 

Pune Crime | महिलेला बेदम मारहाण ! मृत्यूस जबाबदार असलेल्या पती-पत्नीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कर्वेनगरच्या हिंगणे होम कॉलनीतील घटना