PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या कारवाई नंतर दिवसात 1 कोटी 86 लाख वसुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मिळकत कर उत्पन्नाचा (PMC Property Tax) यंदा नवा उच्चांक गाठणाऱ्या महापालिकेच्या (Pune Corporation) कर आकारणी आणि संकलन विभागाने आर्थिक वर्ष संपण्यास आठवडा शिल्लक असतानाही उत्पन्न वाढीचे प्रयत्न कायम ठेवले आहे. बड्या थकबाकीदार मिळकत दारांवर आज कारवाई करत तब्बल 1 कोटी 86 लाख 49 हजार रुपये वसूल केले. तर 1 कोटी 58 लाख रुपयांची थकबाकी असलेली एक मिळकत सील केली. (PMC Property Tax)

विक्रम डेव्हलपर्स अँड शारदा कन्स्ट्रक्शन (Vikram Developers & Sharda Construction) यांच्याकडे 1 कोटी 86 लाख 49 हजार 906 रुपये थकबाकी होती. आज ही मिळकत सील करताच संबंधित संचालकांनी थकबाकीच्या रकमेचा धनादेश तातडीने जमा केला. तसेच एरंडवणा येथील मेसर्स आयएलएमएस शेल्टर्स प्रा. लि. अँड मेसर्स आयएलएमएस प्रा. लि. (ILMS Shelters Pvt. Ltd. & ILMS Pvt. Ltd.) यांच्याकडे एक कोटी 58 लाख रुपये थकबाकी आहे. त्यांनी ही रक्कम न भरल्याने आज ही मिळकत सील करण्यात आली. (PMC Property Tax)

 

मिळकत कर आकारणी व संकलन विभागाचे (Property Tax Department, Pune) प्रमुख सहमहापालिका आयुक्त विलास कानडे (Vilas Kanade) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी रविंद्र धावरे (Ravindra Dhavre) , विभागीय निरीक्षक सुरेश धानक (Suresh Dhanak), कमलाकर काटकर (Kamlakar Katkar), पेठ निरीक्षक उमेश कांबळे (Umesh Kamble), विशाल ठाकर (Vishal Thakar) यांच्या पथकाने ही कारवाई केली.

यावर्षी मिळकत कर विभागाने उद्दिष्टांपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळविले आहे.
यंदा प्रथमच मिळकत कराचे उत्पन्न सतराशे कोटींच्या पुढे गेले आहे.
दरम्यान 31 मार्चला आर्थिक वर्ष संपत आहे.
ज्या नागिरकांनी अद्याप मिळकतकर भरला नसेल त्यांनी 31 मार्च पूर्वी तो भरावा व आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन मिळकत कर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title :- PMC Property Tax | 1 crore 86 lakh recovered in a day after the action of Pune Municipal Corporation’s income tax department


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Janhavi Kapoor Bold Photoshoot | जान्हवी कपूरनं घागरा घालून केलं बोल्ड फोटोशूट, मादक फोटो पाहून चाहत्यांचा हृद्याचे वाढले ठोके

Devendra Fadnavis | ‘राजकारण गेलं चुलीत, मला महाराष्ट्राची जास्त चिंता कारण…’ – देवेंद्र फडणवीस

Ingredients For Oily Sensitive Skin | ऑयली आणि संवेदनशील स्किन ! तुमच्या केयर प्रोडक्टमध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश आवश्यक