PMC Property Tax Collection | अबब ! इतिहासात पहिल्यांदा मिळकतकरापोटी पुणे महापालिकेच्या तिजोरीत 1845 कोटींचा भरणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेला (Pune Corporation) उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मिळकत करापोटी महापालिकेच्या (PMC Property Tax Collection) तिजोरीत इतिहासात प्रथमच विक्रमी कर जमा झाला आहे. 31 मार्च अखेर पुणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये 1845.91 कोटी इतका मिळकत कर (PMC Property Tax Collection) जमा झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर खात्याच्या आज पर्यंतच्या कोणत्याही आर्थिक वर्षातील जमा रक्कमेचा विचार केला तर यंदाच्या आर्थिक वर्षातील (Financial Year) ही उच्चांकी रक्कम असल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सह आयुक्त विलास कानडे (PMC Joint Commissioner Vilas Kanade) यांनी दिली.
1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत पुणे महापालिकेच्या हद्दीतील 8 लाख 68 हजार 671 मिळकत धारकांनी मिळकत करापोटी (PMC Property Tax Collection) 1845.91 कोटी रुपये जमा केले आहे. या आर्थिक वर्षात काही कालावधीसाठी लॉकडाऊन (Lockdown) असल्यामुळे मिळकत धारकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंट (Online Payment) द्वारे मिळकत कराचा भरणा केला आहे.
अभय योजनेतून 108 कोटींचा मिळकत कर
पुणे महापालिकेच्या वतीने निवासी मिळकत धारकांसाठी (Residential Property Holder) अभय योजना (PMC Abhay Yojana) लागू केली होती. ही योजना 7 जानेवारी 2022 ते 26 जानेवारी 2022 आणि 8 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत दोन टप्प्यात राबवण्यात आली होती. अभय योजनेत पात्र असलेल्या मिळकत धारकांपैकी 48 हजार 304 निवासी मिळकतधारकांनी 108.83 कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे.
नव्याने नोंद झालेल्या मिळकतीमधून 219 कोटींचा कर जमा
मिळकत कर जास्तीत जास्त वसूल करण्याबरोबरच आकारणी न झालेल्या मिळकतींची आकारणी करण्यासाठी पुणे महापालिकेने नियोजन केले होते.
त्यामुळे आता पर्यंतच्या एक वर्षातील नव्याने आकारणी होणाऱ्या मिळकतींचा उच्चांकी आकडा आहे.
यामध्ये 71 हजार 220 एवढ्या नव्याने मिळककतींची नोंद करण्यात आली आहे.
या मिळकतीमधून महापालिकेच्या तिजोरीत 219.23 कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे.
वाढीव आकारणीतून 201 कोटी
वापरात बदल झालेल्या मिळकतींची देखील मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली.
या आर्थिक वर्षामध्ये 98 हजार 611 मिळकतींची बदलाप्रमाणे वाढीव आकारणी करण्यात आली.
त्यामुळे महापालिकेला या वर्षात वाढीव आकारणीतून 201.04 कोटी रुपयांचा अतिरिक्त कर मिळाला आहे.
Web Title :- PMC Property Tax Collection | For the first time in history, 1845 crore Pune Municipal Corporation PMC Property Tax Collection
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Rubina Dilaik Gorgeous Look | रुबीना दिलैकच्या सुपरबोल्ड अदांवर चाहते झाले फिदा, पाहा व्हायरल फोटो…
Nana Patole | ‘सतीश उकेंकडील महत्त्वाच्या फाईल्स जप्त करण्यासाठीच ED ने धाड टाकली – नाना पटोले