PMC Property Tax | 4 दिवसात 45684 पुणेकरांनी पुणे महापालिकेकडे जमा केला 45.88 कोटी रूपये मिळकत कर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या मिळकत करापोटी 45.88 कोटी इतकी मिळकत रक्कम जमा झाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पहिल्या चार दिवसात 45 हजार 684 मिळकतधारकांनी मिळकत करापोटी 45.88 कोटी रुपये रक्कम (PMC Property Tax) महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) तिजोरीत जमा केला आहे. यामध्ये जवळपास 91.25 टक्के इतकी मिळकत रक्कम ऑनलाईनच्या माध्यमातून जमा करण्यात आली आहे.

 

वर्ष 2022-23 चा मिळकत कर जमा करता यावा. यासाठी खात्याकडे उपलब्ध असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून 8 लाख 88 हजार 207 इतक्या मिळकतधारकांना मेसेजच्या माध्यमातून लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर 6 लाख 69 हजार 512 मिळकतधारकांना कर भरणे संदर्भात इमेलद्वारे कळविण्यात आले आहे. (PMC Property Tax)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

दरम्यान, मिळकत कर बिल प्राप्त करुन घेण्यासाठी किंवा कर भरण्यासाठी मिळकतधारकांनी त्यांचा आधीचा मिळकत कर नंबर सांगून माहिती देण्यासाठी महापालिका मुख्य कार्यालय आणि संबधित क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी मिळकत कराविषयी माहिती देण्यासाठी कर्मचारीही असणार आहेत. त्यासाठी 020-25501159 या नंबरवर संपर्क केल्यास माहिती उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दि. 31 मे 20222 पर्यंत सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील मिळकत कर भरणा केंद्र सुरू राहणार आहेत.
अशी माहिती सह महापालिका आयुक्त (कर आकारणी व कर संकलन) विलास कानडे (PMC Vilas Kanade) यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

 

 

Web Title :- PMC Property Tax | In 4 days 45684 Punekars submitted property tax of Rs. 45.88 crore to Pune Municipal Corporation (PMC)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis – Raj Thackeray | मनसे-भाजपचं होणार मनोमिलन ?; नितीन गडकरींनंतर फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट !

 

Chhagan Bhujbal On Raj Thackeray | राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची राज ठाकरेंवर टीका, म्हणाले – ‘भाजपाविरोधात बोलता बोलता कोहिनूर टॉवर एकदम हलायलाच लागला’

 

Obesity And Acidity | पाण्यात ‘ही’ एक वस्तू मिसळून पिण्यास करा सुरूवात, वितळू लागेल चरबी आणि दूर होईल अ‍ॅसिडिटी