PMC Pune Elections | निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही ‘प्रारूप प्रभाग रचनेत’ ऐनवेळी मोठे फेरबदल !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Pune Elections | महापालिकेच्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणावर ‘राजकीय’ हस्तक्षेप झाल्याचे आरोप झाल्याने निवडणूक आयोगाने (State Election Commission) यामध्ये बदल केले. परंतु 28 जानेवारीला राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेचा (Draft Ward Structure) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये बदल करण्यात आल्याचा चर्चेला उधाण आले आहे. (PMC Pune Elections)

 

पुणे महापालिकेने (Pune Corporation) 6 डिसेंबरला निवडणूक आयोगाला प्रारूप प्रभाग रचना सादर केली. या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप झाल्याने निवडणूक आयोगाने यामध्ये 24 बदल सुचवले. एवढेच न्हवे तर महापालिका अधिकाऱ्यांना समोर बसवून ते पुन्हा दुरुस्त करून घेतले. दरम्यान 28 जानेवारीला निवडणूक आयोगाने 1 फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग रचना हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या ही प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

 

परंतु राज्य निवडणूक आयोगाचे 28 जानेवारीला निघालेले आदेश 30 जानेवारीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास व्हायरल झाले.
या मधल्या काळात निवडणूक आरोगाने पुन्हा 12 प्रभागांमध्ये बदल केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या अंतिम टप्प्यात अनेक दिग्गजांना निवडणुकी पूर्वीच धोबी पछाड देण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. (PMC Pune Elections)

 

या संदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar)
यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 6 डिसेंबर ला आम्ही प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला आहे.
त्यानंतर महापालिकेचा प्रभाग रचनेशी काहीच संबंध राहिला नाही असे सांगत त्यांनी चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात ढकलला.

 

Web Title :- PMC Pune Elections | Even after the announcement of ward formation program by the Election Commission, big changes in ‘draft ward structure’!

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या DA एरियरबाबत आली खुशखबर ! ‘या’ दिवशी खात्यात येतील 2 लाख रुपये, जाणून घ्या सर्वकाही

 

Pune Crime | सिंहगड रोड परिसरातील नर्‍हेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 28 जणांवर कारवाई

 

Budget-2022 | बजेट सादर होण्याआधी मिळाली आनंदाची बातमी, तुम्हाला मिळणार ‘हा’ मोठा फायदा