×
Homeताज्या बातम्याPMC Rajiv Gandhi Academy of E-Learning | राजीव गांधी अकॅडमी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या...

PMC Rajiv Gandhi Academy of E-Learning | राजीव गांधी अकॅडमी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा 97.49 टक्के निकाल; आबा बागुल यांच्याकडून गुणवंतांचं विशेष कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बुधवारी राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result) ऑनलाइन जाहीर झाला. यामध्ये पुण्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. माजी उपमहापौर व काँग्रेस (Congress) पक्षाचे गटनेते आबा बागुल (Aba Bagul) यांच्या संकल्पनेतून देशात प्रथमच साकारलेल्या आणि रोल मॉडेल ठरलेल्या पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमीच्या (PMC Rajiv Gandhi Academy of E-Learning) कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 97.49 टक्के निकाल लागला आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई- लर्निंग स्कुलचे (PMC Rajiv Gandhi Academy of E-Learning) विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहेत आणि विविध क्षेत्रात यशस्वी पदार्पण करत आहेत.

 

पुणे महानगरपालिका संचलित राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ-लर्निग स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स (Rajiv Gandhi Academy of E-Learning School and Junior College of Science) पुणे या कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष एप्रिल/मे 2022 चा इयत्ता बारावीचा निकाल 97.49 टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा एकूण 403 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 389 विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून यंदा निकाल 97.49 टक्के लागला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आबा बागुल यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील करिअरसाठी (Career) हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्गाचेही आबा बागुल यांनी आभार व्यक्त करून गुणवत्तेची ही उत्तुंग भरारी सदैव असू द्या अशा शुभेच्छाही दिल्या. (PMC Rajiv Gandhi Academy of E-Learning)

विशेष म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अल्पावधीत ख्याती निर्माण करणाऱ्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमधील (PMC Rajiv Gandhi Academy) विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. 2017 च्या बॅचमधील नितिशा संजय जगताप (Nitisha Sanjay Jagtap) ही आज ‘आयपीएस अधिकारी’ (IPS Officer) झाली आहे. नितिशाची बहीण तनिशा जगताप (Tanisha Jagtap) ही सुद्धा 2015 च्या बॅचमधून घवघवीत यश संपादन करून आज इंजिनीअर (Engineer) म्हणून कार्यरत आहे. राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई- लर्निंग स्कुलने दहावी -बारावी आणि अन्य परीक्षांच्या निकालांमध्ये सातत्याने शंभर टक्क्यांची परंपरा कायम राखली आहे. आयआयटीमध्ये (ITI) 500 विद्यार्थी तर जेईईमध्ये (JEE) 1000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. इतकेच नाहीतर ‘नासा’साठी (NASA) दोन विद्यार्थीही पात्र ठरले आहेत.
खऱ्या अर्थाने हा गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा जल्लोष आहे.

 

Web Title :- PMC Rajiv Gandhi Academy of E-Learning | 97.49 per cent result of Science Branch
of Rajiv Gandhi Academy, Junior College; Special appreciation of merit from Aba Bagul

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News