COVID-19 जनजागृती मोहिम : पुणे मनपाच्या चौधरी यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे प्रमाणपत्र

पुणे : प्रतिनिधी – कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ऑनलाइन कोविड-19 जनजागती मोहिमेमध्ये 20 बेसिक प्रश्न दिले होते. ही ऑनलाइन कोविड-19 परीक्षा 29 एप्रिल 2020 रोजी घेतली होती. या उपक्रमामध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्र.81-बी च्या मुख्याध्यापिका नलिनी चौधरी यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. चौधरी यांनी कोविड-19 या परीक्षेमध्ये सहभाग घेऊन कोरोनाची साखळी मोडू या, कोरोनाला परतवून लावू या. 2020 साली आपण फायदा-तोडा पाहायचा नाही, तर आपण सर्वांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी कोरोना या विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करून इतरांचे संरक्षण करणे हेच आपले ध्येय आहे, हीच आपली 2020 सालची मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे, असे चौधरी यांनी सांगितले.