PMC Skysign Department | आकाशचिन्ह विभागाने अनियमीत 153 होर्डींग्जसाठी नोटीस दिल्या

होर्डींग्जच्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत देण्यात येणार्‍या परवानग्या बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMC Skysign Department | महापालिकेच्या (Pune Municipal Corporation-PMC) परवाना व आकाशचिन्ह विभागाने सुरु केलेली होर्डींगच्या विरोधातील कारवाई सध्या थंडावली आहे. आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी दिलेल्या आदेशानुसार पुन्हा सर्वेक्षण सुरु केले असुन, १५३ जणांना नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच यापुढे क्षेत्रिय कार्यालयाकडून दिल्या जाणार्‍या होर्डींग परवानग्या बंद करून मुख्यखात्याकडूनच त्या देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.(PMC Skysign Department)

घाटकोपर आणि मोशी येथे होर्डींग कोसळल्यानंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली होती. यानंतर प्रशासनाने बेकायदेशीर आणि नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या होर्डींगवर कारवाई सुरु केली होती. दरम्यान, मान्सुनपुर्व पाऊस हा जोरदार वार्‍यासह बरसत असल्याने प्रशासनाने होर्डींग व्यावसायिकांना फ्लेक्स उतरविण्यास सांगितले होते. त्यानुसार काही व्यावसायिकांनी होर्डींग उतरविले. परंतु होर्डींगविरोधातील कारवाई थंड पडल्याने आयुक्त भोसले यांनी परवाना व आकाशचिन्ह विभागाला होर्डींगचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. हे सर्वेक्षण करताना होर्डींगचा मोटो काढण्याचे बंधन घालण्यात आले. तसेच अनधिकृत होर्डींगची माहीती मागविली होती. याबाबतचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्यास सांगितले होते. अद्याप हे अहवाल प्राप्त झाले नाही, काही निरीक्षकांकडून माहीती जफा केली जात आहे. त्यानुसार जाहीरात नियफावली डावलून उभारलेल्या होर्डींगच्या मालकांना नोटीस पाठविण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत १५३ जणांना नोटीस पाठविली गेल्याची माहीती प्रशासनाने दिली.

नवीन जाहीरात नियफावली २०२२ साली लागू झाली आहे. या नियफावलीनुसार ४० बाय २० फुट एवढ्या आकाराचे होर्डींग उभारता येते. परंतु ही नियमावली लागू करण्यापुर्वी सदर आकारापेक्षा अधिक आकाराच्या होर्डींगला परवानगी दिली आहे. त्याच परवानगीच्या आधारे काही व्यावसायिकांकडून मोठे होर्डींग कायफ ठेवण्याचा आग्रह केला जात आहे. काही व्यावसायिकांनी अद्याप आकार बदलला नाही. तसेच दोन होर्डींगच्या मध्ये निर्धारीत केलेले अंतरही पाळले जात नाही. याबाबत प्रशासनाने नवीन नियफावलीनुसारच होर्डींगचा आकार असला पाहीजे अशी भुमिका घेतली आहे. या होर्डींगच्या परवान्याचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागते. नुतनीकरण करताना नवीन नियफावलीतील आकारानुसारच होर्डींगचा आकार ठेवला पाहीजे अशी प्रशासनाची भुमिका आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aundh Pune Crime News | पुणे : पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने तिघांना रॉडने बेदम मारहाण, दोघांची प्रकृती चिंताजनक; औंध परिसरातील घटना

PM Kisan Samman Nidhi | तारीख ठरली! पुढील आठवड्यात ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येतील पैसे