PMC Standing Committee | पुणे मनपाच्या स्थायी समितीने आज दिली ‘या’ विषयांना मान्यता; वाचा संपूर्ण यादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिका स्थायी समितीची (PMC Standing Committee) बैठक अध्यक्ष हेमंत रासने (hemant rasane) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली, शहरासाठी महत्वाच्या असणाऱ्या विविध विषयांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पीएमपीएमएल (PMPML) कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मुहूर्तावर बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. (PMC Standing Committee)

 

स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेले महत्वाचे विषय

– पीएमपीएमएलच्या 10 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनससाठी 24 कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यात आली आहे, प्रत्येक कर्मचाऱ्यास किमान 15 ते 20 हजारांपर्यंत बोनस मिळू शकेल. (PMC Standing Committee)

– सिएनजीवर (CNG) चालणाऱ्या पीएमपीएमएल बसच्या थकीत बिलापोटी एमएनजीएलला (MNGL) 10 कोटी देण्यास मान्यता

– सणस ग्राउंड येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभ्यास साहित्य घेण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी 91 लाख रुपये देण्यास मान्यता

– दशरथ भानगिरे रुग्णालयात कॅन्सर, आयसीयू आणि अस्थीरोग हेल्थकेअर युनिट सुरू करण्यासाठी मान्यता

– अण्णासाहेब मगर रुग्णालयात 42 लाख 75 हजार किमतीचा ऑक्सिजन प्लांट बसवण्यासाठी निधीची तरतूद

– वडगाव जलशुद्धीकरण केंद्र चालवण्याकरिता ढाकवे इंजिनिअरिंग या संस्थेत देण्याची मान्यता.

– शहरातील 4 मुख्य ड्रेनेज लाईन साफ करण्याकरिता चार जेटिंग मशीन भाड्याने घेण्यासाठी मान्यता, 7 वर्षांसाठी एकूण 32 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी. प्रत्येक झोनला 1 मशीन उपलब्द करून दिली जाणार आहे.

– स्मार्ट सिटी अंतर्गत एटीएमएस (Traffic Signal Management) सिग्नल सिंक्रोनायजेशनसाठी 72ब नुसार 58 कोटींची मान्यता, शहरातील एकूण 261 पैकी 125 सिग्नलला संबंधित यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून सिग्नलचे टायमिंग मॅनेजमेंट केले जाणार आहे. (PMC Standing Committee)

– पुणे महानगरपालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त माध्यमातून आर्थिक मागासवर्ग तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी प्रकल्प राबवण्यास मान्यता.

– नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये शहरी गरीब योजना राबवण्यास स्थायी समितीची मंजुरी

 

Web Title :- PMC Standing Committee | Pune Municipal Corporation Standing Committee today approved ‘these’ issues; Read the full list

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fake Tea Leaf Detection | तुम्ही बनावट चहापत्तीचे सेवन करत आहात का?, ‘या’ अतिशय सोप्या ‘ट्रिक’ने घरबसल्या जाणून घ्या

Kranti Redkar | क्रांती रेडकरचा खुलासा ! ‘मराठी असल्याचा मला अभिमान, मला आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी’

Vitamin C deficiency symptoms | हिरड्यांमध्ये रक्त, सतत आजारी पडणे, थकवा आणि कमजोरी ‘ही’ आहेत व्हिटॅमिन C च्या कमतरतेची 8 लक्षणे

Pune Crime | 3 वर्षात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 5 कोटींची फसवणूक; दोन कंपन्यांच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल