PMC To Start Signature Walk To Sinhagad Fort And Shivsrushti | पुणे : सिंहगड किल्ला, आंबेगाव शिवसृष्टी येथे लवकरच ‘सिग्नेचर वॉक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – PMC To Start Signature Walk To Sinhagad Fort And Shivsrushti | सिंहगड किल्ला, आंबेगाव शिवसृष्टी येथे पुणे महापालिका लवकरच सिग्नेचर वॉक सुरू करणार आहे. यासाठी शहरातील विविध भागातील पर्यटकांना स्वारगेट येथून वातानूकुलित मिनी बसची सुविधा देण्यात येईल. या उपक्रमांमधून पुणे शहराचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व याची ओळख विद्यार्थी, नागरिक आणि पर्यटकांना करून देण्यात येईल. सध्या शनिवार वाडा ते विश्रामबागवाडा हेरिटेज वॉकला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ( PMC To Start Signature Walk To Sinhagad Fort And Shivsrushti)

सिंहगड किल्ला आणि आंबेगाव शिवसृष्टी या सिग्नेचर वॉकची आज चाचणी घेण्यात आली. या डेमो वॉकमध्ये पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते, शाखा अभियंता दीपक बारभाई आणि गाईड डॉ. अजित आपटे यांनी सहभाग घेतला होता. ( PMC To Start Signature Walk To Sinhagad Fort And Shivsrushti)

देश आणि परदेशातील पर्यटक, शहरातील नागरिकांना सिग्नेचर वॉकचा लाभ घेता येईल.
यासाठी स्वारगेट येथून बसेस उपलब्ध होतील. सकाळी साडेसहा वाजता हेरिटेज वॉक सुरू होईल. यात सिंहगड किल्ला व त्यावरील ऐतिहासिक ठिकाणे दाखवण्यात येतील. सिंहगड किल्ल्यानंतर या सिग्नेचर वॉकमध्ये आंबेगाव येथील शिवसृष्टी दाखविण्यात येईल.

या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी हेरिटेज वॉक डॉट पीएमसी डॉट गव्ह डॉट इन ही लिंक असून ऑनलाईन बुकिंग करता येईल.

ही कामे तातडीने पूर्ण केली जातील…

  • या उपक्रमांसाठी नरवीर तानाजी मालुसरे समाधी स्थळ येथे पर्यटकांना सुविधा पुरवण्यासाठी समाधी स्थळाच्या दर्शनी भागामध्ये दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू केले जाईल.
  • छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधी स्थळाचे जतन आणि संवर्धन करण्याचे कामही हाती घेण्यात येईल.
  • सिंहगड किल्ल्यावर दिशादर्शक बोर्ड बसविण्यात येतील.

सध्या हेरिटेज वॉक उपक्रमांतर्गत शनिवार वाडा ते विश्रामबागवाडा या ऐतिहासिक वास्तू दरम्यानची बारा ऐतिहासिक ठिकाणे पायी फिरून दाखवली जात आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौऱ्याबाबत दिले स्पष्टीकरण; कायदेतज्ज्ञांच्या घेतल्या भेटी

Bachchu Kadu On BJP | ‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यास…’, बच्चू कडूंचा भाजपला इशारा