Pune : नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेकडून रिलायन्स मार्टला 10 हजारांचा दंड

कात्रज : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सोशल डिस्टसिंगचे पालन न केल्याप्रकरणी रिलायन्स मार्ट १० हजारांचा दंड करण्यात आला. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कात्रज -कोंढवा रस्त्यावरील खडी मशीन चौकातील रिलायन्स मार्ट येथे ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, रिलायन्स मार्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच या गर्दीवर मार्ट व्यवस्थापनाचे कोणतेही नियंत्रण ठेवले जात नव्हते. त्यानंतर कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. ज्‍योती धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख आरोग्य निरीक्षक ए. पी. मंन्र्दुपकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, आरोग्य निरीक्षक अभिजीत सुर्यवंशी, सचिन बिबवे, दया तेलंगे यांनी ही कारवाई केली. मंगलदास माने यांनी यावेळी रिलायन्स मार्टला या प्रकरणी समजपत्रही देण्यात आले असून पुढे आणखी नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली.