PMC Water Supply | समान पाणी पुरवठा योजना ! भाजपच्या 100 नगरसेवकांनी 5 वर्ष झोपा काढल्या का?; ‘पुणेकरांनी पाठविले दिल्लीत; खा. बापट अडकले गल्लीत’ – माजी आ. मोहन जोशी (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Water Supply | समान पाणी पुरवठा योजना (PMC 24×7 Water Supply Project) मार्गी लागत नाही अशा तक्रारी म्हणजे अपयशाची भाजपचे खासदार (BJP MP) गिरीश बापट (Girish Bapat) यांची कबुली आहे. पुणे महापालिकेत (Pune Corporation) सत्ताअसताना झोपा काढल्यात का ? असा सवाल माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केला आहे. (PMC Water Supply)

 

लोकसभेचे अधिवेशन चालू असतानाही भाजपचे खासदार गिरीश बापट संसदेत गैरहजर आहेत. पुणेकरांनी त्यांना दिल्लीत पाठविले पण, ते गल्लीतच अडकले अशी अवस्था त्यांची आणि त्यांच्याबरोबर भाजपची झाली आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

पुणेकरांनी पाठविले दिल्लीत; खा. बापट अडकले गल्लीत

पुण्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकार, राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदारांनी संसद अधिवेशन चालू असताना दिल्लीत राहाणे अपेक्षित आहे. अधिवेशन काळात सर्व खात्यांचे मंत्री, सचिव सहज उपलब्ध होतात आणि त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणे सोपे जाते. परंतु, खासदार गिरीश बापट दिल्लीत न जाता पुण्यातच थांबले आहेत आणि त्यांनी आपले आणि आपल्या पक्षाचे अपयश झाकण्यासाठी स्टंटबाजी चालविली आहे. समान पाणीपुरवठा योजना मुदतीत पूर्ण न झाल्याने बापट यांनी महापालिका प्रशासनावर राग काढलेला आहे. भाजपने ही योजना प्रतिष्ठेची केली. पण, हातात सत्ता असूनही गेल्या पाच वर्षात भाजप ही योजना मार्गी लावू शकलेले नाही आणि आता योजनेच्या कामाला गती मिळत नाही अशी आगपाखड चालू केलेली आहे. आधीची पाच वर्षे बापटांकडे पुण्याचे पालकमंत्रीपद होते, आता ते खासदार आहेत या सर्व कालावधीत त्यांनी ही योजना मार्गी लावली असती तर, त्यांना दिल्ली सोडून पुण्यातच स्टंटबाजी करत अडकून पडावे लागले नसते, असे माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. (PMC Water Supply)

 

समान पाणीपुरवठा योजनेला सहकार्य करा याकरिता माजी नगरसेवकांना आवाहन करणारे पत्र खासदार गिरीश बापट पाठविणार आहेत. भाजपच्या १०० नगरसेवकांना ‘आजी’ असताना जे जमले नाही ते आता ‘माजी’ झाल्यावर जमणार आहे का ? सर्वच प्रकार हास्यास्पद आहे.
नदीसुधार प्रकल्प (Pune River Development Project), स्मार्टसिटी प्रकल्प (Pune Smart City Project) अशा अनेक योजना पूर्ण करण्यात भाजपला अपयश आलेले आहे.
वास्तविक या अपयशाबद्दल माफी मागणारी पत्रं खासदार बापट यांनी पुणेकरांना पाठवायला हवीत.
पुणेकरांनी तुम्हाला दिल्लीत पाठवलंय, तेव्हा दिल्लीत जा, प्रश्न मार्गी लावा, आपल्या लोकांकडून कामें पूर्ण करुन घ्या, स्टंटबाजी थांबवा.
या स्टंटबाजीला पुणेकर आणि तुमच्याच पक्षातील अनेकजण कंटाळले आहेत याचा विचार करा,
असे माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

 

Web Title :- PMC Water Supply | Same water supply scheme Did 100 BJP corporators sleep for 5 years Punekars sent to Delhi MP Girish Bapat stuck in the city Former MLA Mohan Joshi (Video)

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा