PMC Water Supply | कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचा वापर वाढला ! पाणी बचतीसाठी पिण्याचे पाणी वापरणारी वॉशिंग सेंटर्स, बांधकामे बंद करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Water Supply | कडक उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पाण्याची मागणी वाढत असतानाच धरणातील पाणीसाठ्याचा विचार करून महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) पाणी बचतीचे धोरण स्वीकारले आहे. जूनअखेर पर्यंत नवीन नळजोड न देण्याच्या निर्णयासोबतच पिण्याचे पाणी वापरात असलेली वॉशिंग सेंटर्स, बांधकामे देखिल थांबविण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. (PMC Water Supply)

 

यंदा कडक उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. आजमितीला दररोज सोळाशे एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणसाखळीतही जेमतेम ३५ टक्के पाणीसाठा आहे. यातून शेतीसाठीही पाणी पुरवठा करावा लागणार आहे. मागील काही वर्षांचा अनुभव पाहाता जून अखेरपर्यंत पाउस पडत नाही. त्यामुळे आहे त्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. या नियोजनाचाच एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने जून अखेरपर्यंत नवीन नळजोड देणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (PMC Water Supply)

 

यासोबतच ज्या वॉशिंग सेंटर्सवर पिण्याच्या पाण्याचा वापर होतो ती सेंटर्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास ती बांधकामे देखिल बंद करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar PMC) यांनी दिली.

 

बांधकामे तसेच रस्त्यांच्या कामांसाठी एस. टी. पी. तील पाण्याचा वापर अनिवार्य करण्याचा विचार

बांधकामासाठी मैलापाणी प्रक्रिया केंद्रातील अर्थात एसटीपी प्लांटमधील पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने दोन महिन्यांपुर्वी केले आहे.
त्यानुसार मागील दोन महिन्यांत एसटीपी प्लांटमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर काही अंशी सुरू झाला आहे.
परंतू वाढत्या शहराची पाण्याची गरज लक्षात घेता, पाण्याचा मोठ्याप्रमाणात पुर्नवापर अनिवार्य करावा लागणार आहे.
याचाच एक भाग म्हणून बांधकाम परवानगी देताना बांधकामासाठी तसेच महापालिकेच्या विकासकामांच्या (सीसी रस्ते, भवन, उड्डाणपुल, पदपथ)
निविदांमध्येच कामासाठी एस.टी.पी.तील पाण्याचा वापर बंधनकारक करता येईल? यादृष्टीने चाचपणी करण्यात येत आहे.
मेट्रोच्या कामासाठी देखिल भुगर्भातील पाण्याऐवजी एस.टी.पी.तील पाण्याचा वापर करावा,
असे पत्रही महामेट्रोला पाठविण्यात येणार असल्याची माहिती अनिरूद्ध पावसकर यांनी दिली.

 

Web Title :- PMC Water Supply | Severe summers increase water consumption! Washing centers that use drinking water to save water will be closed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा